अण्णा हजारे पुन्हा मैदानात ;  याचिका दाखल करणार

आम्ही भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन चळवळीचे खंडित झालेले काम लवकरच पुन्हा सुरू करीत आहोत,
3anna_20hajare_16.jpg
3anna_20hajare_16.jpg

पारनेर : राज्य सरकारने नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविली आहे. याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे Anna Hazare यांनी नाराजी व्यक्त केली. घटनेप्रमाणे सर्व मादक पदार्थांवर सरकारला बंदी आणण्याचा अधिकार आहे. मात्र, सरकार जेथे बंदी आहे, त्या ठिकाणची बंदी उठविण्याचे काम करीत आहे. याचा अर्थ, सरकार नशा करण्यास जनतेला प्रोत्साहन देत आहे, अशी टीकाही हजारे यांनी केली.

''समाजाच्या भल्याकडे न पाहता सरकार केवळ पैशांकडे पाहत आहे. त्याच कारणातून सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविली. याला राज्यभरातून सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. आता आम्हीच याविरोधात उच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार आहोत,'' अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

''दारू वाईट आहे. त्यामुळे शांतताभंग होते. इतकेच नव्हे, तर दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. अनेक महिलांना त्रास होतो. असे असतानाही केवळ मोठ्या प्रमाणात कर मिळतो, या भावनेने सरकारने दारूबंदी उठविली आहे. ही बाब अतिशय चुकीची आहे. सरकारच्या या निर्णयाला खऱ्या अर्थाने जनतेतून विरोध होणे गरजेचे आहे. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आता आम्ही याबाबत उच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार आहोत. कारण, सरकार घटनेचे पालन करणार नसेल, तर न्यायालयात न्याय मागणे, हाच एकमेव व शेवटचा पर्याय जनतेकडे असतो,'' असेही हजारे म्हणाले.

 
भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी, तसेच सरकार घेत असलेल्या चुकीच्या काही निर्णयांना विरोध करण्यासाठी जनतेचा दबाव सरकारवर असणे गरजेचे आहे. असा दबाव निर्माण करण्यासाठी निःस्वार्थी सामाजिक संघटना उभ्या राहाणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन चळवळीचे खंडित झालेले काम लवकरच पुन्हा सुरू करीत आहोत, 

अण्णा हजारे, समाजसेवक  

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com