राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही!

पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती.
राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही!
Sharad Pawar, Amit Shah .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. सुरवातीला साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर या दोघांमध्ये सुमारे 15 मिनिटे स्वतंत्रपणे चर्चा झाली. पवारांनी पंधरा दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शहांचीही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप, राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. (Anjali Damania criticizes NCP & Bjp) 

या संदर्भात अंजली दमानिया यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ''राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही जस  मिलिटरी attack/retreat करतांना Cover fire देतात तोच प्रकार आपण आज पहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला एक cover up करण्यासाठी होता. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजप विरुद्धच आहोत'' असे दमानिया यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती. ही भेट सरकारी बँका व कोरोनाशी संबंधित मुद्यांवर झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पण या भेटीने राज्यात खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांकडूनच स्बवळाची भाषा सुरू झाल्यानंतर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले होते. आता पंधरा दिवसांतच शरद पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे. 

अमित शहा यांच्या भेटीवेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रीय सहकारी साखर फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर उपस्थित होते. या बैठकीत साखरेचे दर, इथेनॉल निर्मिती, साखर कारखाने व सहकारीशी संबंधित काही मुद्यांवर चर्चा झाली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. त्यानंतर शहा व पवार यांची पुन्हा स्वतंत्र बैठक झाली.

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.