अनिल परब यांनी म्हाडाची जमीन लाटली...किरीट सोमय्यांचा आरोप - Anil Parab misused mhada land Kirit Somaiya allegation | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल परब यांनी म्हाडाची जमीन लाटली...किरीट सोमय्यांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हाडाची जमीन लाटली, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हाडाची जमीन लाटली, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्यावर कारवाई करणार का ? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. 

अन्वय नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. 

चंद्रकात पाटील यांनीही किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरण हे जाणीवपूर्वक समोर ठेऊन अर्णव गोस्वामी प्रकरणावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, ''किरीट सोमय्या यांनी ठोस कागदपत्रे बाहेर काढली आहेत. ती खोटी वाटत असतील तर शिवसेनेने न्यायालयात जावे,"

अन्वय नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील जमीन व्यवहाराबाबत भाजपच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'सामना' रंगला आहे. "मुख्यमंत्र्यांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी आरोपांचे उत्तर द्यावे," असे आव्हान किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. त्यावरुन शिवसेना नेते किरीट सोमय्यांना लक्ष्य बनवत आहेत. आज साताऱ्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोमय्यांची पाठराखण केली.

अन्वय नाईक आणि ठाकरे परिवारामध्ये तीन हजार कोंटीचा जमीन गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच दहीसर, भूखड गैरव्यवहाराबाबत आमच्याकडे कागदपत्रे, पुरावे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. हिम्मत असेल संजय राऊतांनी यावर बोलावं, असं सोमय्या म्हणाले. संजय राऊत मुळ प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कथित घोट्याळ्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.  'भूखंडाचं श्रीखंड करणारे हे सरकार आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

ठाकरे परिवाराने या परिसरात 40 जमिनीचे तुकडे घेतलं. त्यातील 21 हे जमिन व्यवहार हे अन्वय नाईक परिवाराशी संबधित आहेत. ठाकरे यांच्यावरील पाच आरोपांपैकी एका आरोपाचं तरी उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली. माझ्याकडील पुरावे चुकीचे असतील तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे, असे सोमय्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेकडे हिम्मत नाही म्हणून ते उत्तर देत नाही. परिवहन मंत्री अनिल परब, महापैार किशोरी पेडणेकर यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी कारवाई करतील, असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. 

उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात 21 जमीन व्यवहार झाले आहेत," असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काल पत्रकार परिषदेत केला. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटूंबियांचे व्यवहार काय आहेत हे जनतेसमोर आले पाहिजे
, असे किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख