अनिल परब यांची हुलकावणी! पत्राद्वारे केली ईडीकडं ही मागणी

मनी लाँर्डिंग प्रकरणी ईडीने परब यांना रविवारी नोटीस बजावली आहे.
Anil Parab has sent a letter to the ED asking for a period of 14 days
Anil Parab has sent a letter to the ED asking for a period of 14 days

मुंबई : परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मंगळवारी ईडीला हुलकावणी दिली. त्यांनी ईडीला पत्र पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा वेळ मागितला आहे. अद्याप ईडीनं यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे परब यांच्या पत्रावर ईडी मुदत देणार की दुसरी नोटीस पाठवणार याकडं लक्ष लागलं आहे. (Anil Parab has sent a letter to the ED asking for a period of 14 days) 

मनी लाँर्डिंग प्रकरणी ईडीने परब यांना रविवारी नोटीस बजावली आहे. त्यात त्यांना मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. परब यांना नोटीस आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर सोमवारी ईडीने छापेमारी केली. तसेच, अन्य दोन ठिकाणीही ईडीने छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. खरमाटे यांच्यावर बदली प्रकरणात वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ईडीच्या नोटीशीनंतर परब यांनी मंगळवारी चौकशीला सामोरे जाण्याचं टाळलं आहे. त्यांनी वकिलामार्फत ईडीला पत्र पाठवून 14 दिवसांची मुदत मागितली आहे. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले असून ते रद्द करता येणार नसल्याचे परब यांनी पत्राद्वारे ईडीला कळवले आहे. ईडीने परब यांचे पत्र स्वीकारले असून त्यांना वेळ द्यायचा की, दुसरी पाठवायची याबाबत अद्याप ईडीची भूमिका समजू शकलेली नाही.

दरम्यान, परब यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी भाजपला इशारा देत ‘आमचेही दिल्लीत दिवस येतील’ असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवसेना नेत्यांवर काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत. आम्हाला ईडीची नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. शिवसेना हे सध्या ईडीचे लक्ष्य आहे. मात्र, त्याचा तसूभरही परिणाम राज्य सरकारवर होणार नाही. आमचे मनोधैर्य खचणार नाही उलट वाढेलच. परब कायदा क्षेत्रातले जाणकार अल्याने काय करायचे हे त्यांना माहित आहे. 

राजकीय सूडबुद्धीने कारवाई 

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुद्धीने व राजकीय हेतूने घडतंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे, त्यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com