अनिल देशमुखांनी आता आमदारकीचा राजीनामा द्यावा.... - Anil Deshmukh should resign as MLA now Sunil Mendhe | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुखांनी आता आमदारकीचा राजीनामा द्यावा....

अभिजीत घोरमारे
शनिवार, 24 एप्रिल 2021

अनिल देशमुखांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या आमदारकीचा ही राजीनामा देण्याची मागणी  खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे. 

भंडारा :  केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता परत अनिल देशमुखांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या आमदारकीचा ही राजीनामा देण्याची मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा खासदार सुनील मेंढे यांनी केला आहे. 

भाजप नेहमी वाजे प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत असताना राष्ट्रवादी व कॅाग्रेसचे लोक अनिल देशमुख दोषी नसल्याच्या कांगावा करत होते, मात्र आता सीबीआय CBIचौकशीत सर्व समोर येणार असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले आहे. हिच वेळ आहे मुख्यमंत्र्यांनी ही राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली आहे.  

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आज सीबीआयने छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुखांच्या जवळच्या नातेवाईकांचीही चैाकशी होणार असल्याचे समजते. 

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विषयावर टि्वट करत विरोधक भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सीबीआयच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. याबाबत जयंत पाटील यांनी टि्वट केले आहे. देशमुख यांच्या घरावरील सीबीआय कारवाईचा जयंत पाटलांनी निषेध केला आहे. 

''केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल. अनिल देशमुख या प्रकरणातून लवकरच निर्दोष बाहेर पडतील,'' असे  राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख