अजितदादांनी दिलेला शब्द पाळला; अकोटच्या अमोलला आमदारकी दिली!

अमोल मिटकरी यांनी वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळीत काम केले आहे.त्यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात कुडासा हे आहे. ते सामान्य कुटूंबातील आहेत.
amol mitkari got mlc ticket due to ajit pawars politcial weight
amol mitkari got mlc ticket due to ajit pawars politcial weight

पुणे : आपल्या घणाघाती वक्तृत्वाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची खिंड लढवण्याऱ्या अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर "अमोल मिटकरी यांना आमदार करणार' हा जाहीरपणे दिलेला शब्द पाळला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अमोल मिटकरी यांची जडणघडण मराठा सेवा संघात झाली. संभाजी ब्रिगेडने त्यांना राज्यभर स्टेज मिळवून दिले. गेल्या काही वर्षात मिटकरी यांनी राज्यभर त्यांना मानणारा आणि त्यांच्या वाणीवर प्रेम करणारा एक वर्ग निर्माण केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदारपणे टीका केली होती. त्यांच्या भाषणांना मोठा प्रतिसाद मिळत होता. अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात असताना अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी शिवस्वराज यात्रेच्या सभांत भाजपवर जोरदार टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता.

विधानसभा निवडणुकीतही या जोडीने महाराष्ट्रात फिरून अनेक उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यांच्या भाषणावर तरुणाई फिदा झाली होती. विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित दादांनी जाहीरपणे' अमोल मिटकरी यांना आमदार करणार' असे सांगितले होते. आता मिटकरी यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे.

अमोल मिटकरी यांनी वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळीत काम केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुदेव सेवा मंडळापासून त्यांच्या सामाजिक कामाची सुरुवात झाली. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना राज्यभर जाण्याची संधी मिळाली. त्यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात कुडासा हे आहे. ते सामान्य कुटूंबातील आहेत.

डिपॉझिट जप्त झालेल्या पडळकरांना आमदारकी देणारे चंद्रकांतदादा 'रबर स्टँप' आहेत!
पुणे: सांगली जिल्ह्यातील भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेचे तिकीट देण्याच्या मुद्यावरून स्थानिक भाजप नेते खवळले आहेत. भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी याप्रकरणी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

गोपीचंद पडळकर हे 2014 ला भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांना लगेच खानापूर मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर 2018 ला ते पक्षाच्या विरोधात गेले. त्यांनी मोदी, शहा यांच्यावर टीका केली होती. लोकसभेची निवडणूक ते वंचित आघाडीकडून लढले. त्यानंतर विधानसभेला ते भाजपात परत आले. त्यांना पक्षाने बारामतीत उभे केले, तिथे डिपॉझिट जप्त झाले. त्यांचे हे कतृत्व पाहून पक्षाने त्यांना विधान परिषद आमदारकीचे तिकीट दिले कां, असा सवाल त्यांनी प्रदेशाध्यक्षांना विचारला आहे. पडळकरांची भाषणे काढून ऐका, म्हणजे टीका समजेल, असेही केळकर यांनी म्हटले आहे. 

बारामतीत निवडणूक लढणे एवढाच पक्षाचा निकष असेल तर यापुर्वी पक्षाकडून लढणाऱ्यांना कां आमदारकी दिली नाही, असा सवाल केळकर यांनी केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com