पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, अधीक्षकपदी अभिनव देशमुख - amitabh gupat appointed as pune police commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता, अधीक्षकपदी अभिनव देशमुख

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

वेंकटेशम यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले. तसेच एल्गार परिषदेच्या माध्यमातून शहरी नक्षलवादाचा मुद्दाही त्या मुळे चर्चेत आला होता, त्याचा तपास त्यांनी यशस्वीपणे केल्याचा दाखला न्यायालयाने दिला आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेत विशेष अभियानात त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली झाली असून त्यांच्या जागी लाॅकडाऊन काळात वाधवान बंधूंच्या पासमुळे चर्चेत आलेले अमिताभ गुप्ता यांची बदली झाली आहे. पुण्याच्या ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी कोल्हापूरचे अभिनव देशमुख यांची बदली झाली आहे. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाची पदे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदावरून मुदतीच्या आधी हटवलेले संदीप बिष्णाई यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (रेल्वे) येथे नेमण्यात आले आहे. व्यंकटेशम यांना विशेष अभियानाची जबाबदारी मिळाली आहे. प्रधान सचिवपदी असलेल्या गुप्ता यांच्या जागी विनित अगरवाल यांना स्थानापन्न करण्यात आले आहे. विद्युत महामंडळाच्या सूत्रधारी कंपनीचे दक्षता अधिकारी असलेले अनुपकुमारसिंह यांना उपमहासमादेशक होम गार्ड येथे पदस्थापना मिळाली आहे. विनय कारगावकर यांची नागरी हक्क संरक्षण दलाची जबाबदारी मिळाली आहे.

Principal Secretary Amitabh Gupta joins the service | Sarkarnama

अमिताभ गुप्ता

 राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केले. पुण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची नियुक्ती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. देशमुख यांच्या नियुक्तीने त्यास आता पूर्णविराम मिळाला आहे. के. वेंकटेशम यांची पुण्यातील सुमारे तीन वर्षांची कारकिर्द चांगल्या पद्धतीने झाली. त्यांनी पोलिस यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, तसेच अवैध धंद्यांवर ही मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविले होते. पोलीस आयुक्तालयातील इमारतींचे बांधकाम करण्यापासून सुशोभीकरण करण्यापर्यंत अनेक कामे त्यांनी केली होती. एल्गार परिषदेतील आरोपींना अटक करून त्याबद्दल पुरावे गोळा करून त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही मांडले होते.

वेंकटेशम यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले. तसेच एल्गार परिषदेच्या माध्यमातून शहरी नक्षलवादाचा मुद्दाही त्या मुळे चर्चेत आला होता, त्याचा तपास त्यांनी यशस्वीपणे केल्याचा दाखला न्यायालयाने दिला आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेत विशेष अभियानात त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.  संदीप पाटील यांचीही कारकीर्द पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने झाली होती. त्यांनी स्वेच्छेने गडचिरोली परिक्षेत्राची जबाबदारी मागितली होती ती राज्य सरकारने पूर्ण केली.  गुप्ता यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आग्रही होते, असे समजते. पुण्यात यापूर्वी काम केलेले मनोज पाटील यांची नियुक्ती सोलापूर ग्रामीण मधून नगर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी झाली आहे तर पुण्यातील तत्कालीन वाहतूक पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची जळगावच्या जिल्हा अधीक्षकक्षपदी नियुक्ती झाली आहे. पुणे शहरात गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेले विक्रम देशमाने यांची ठाणे  ग्रामीणच्या अधीक्षकपदी निवड झाली आहे.

.........

विशेष पोलिस महानिरीक्षक

ब्रिजेशसिंह- बदली आदेशाधीन- विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशासन मुंबई

मकरंद रानडे- बदली आदेशाधीन- गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

...........SP Dr. Deshmukh fulfills guardianship responsibility and gives insurance  amount in eight days | Sarkarnama

अभिनव देशमुख

 

 

पोलिस अधीक्षक (सध्याचे पद व नव्या नियुक्तीचे ठिकाण)

मोहितकुमार गर्ग- अतिरिक्त पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक रत्नागिरी

विक्रम देशमाने- पोलिस उपायुक्त एटीएस- ठाणे ग्रामीण

राजेंद्र दाभाडे- पोलिस उपायुक्त गुन्हे विभाग मुंबई- पोलिस अधीक्षक सिंधुदर्ग

सचिन पाटील- समादेशक, एसआरपी, गट 11- पोलिस अधीक्षक नाशिक

मनोज पाटील- पोलिस अधीक्षक सोलापूर- पोलिस अधीक्षक नगर

अभिनव देशमुख- पोलिस अधीक्षक कोल्हापूर- पोलिस अधीक्षक पुणे

दीक्षितकुमार गेडाम- पोलिस अधीक्षक सिंधुदर्ग- पोलिस अधीक्षक सांगली

शैलेश बलकवडे- पोलिस अधीक्षक गडचिरोली- पोलिस अधीक्षक कोल्हापूर

विनायक देशमुख- सहायक पोलिस महानिरीक्षक, मुंबई- पोलिस अधीक्षक जालना

राजा रामास्वामी- पोलिस उपायुक्त, गुप्तवार्ता- पोलिस अधीक्षक बीड

प्रमोद शेवाळे- पोलिस उपायुक्त ठाणे- पोलिस अधीक्षक नांदेड

निखील पिंगळे- समादेशक एसआरपी, नागपूर- पोलिस अधीक्षक लातूर

अंकित गोयल- पोलिस उपायुक्त, परिमंडळ 10 मुंबई- पोलिस अधीक्षक गडचिरोली

डी. के. पाटील- पोलिस अधीक्षक बुलढाणा- पोलिस अधीक्षक यवतमाळ

अरविंद चावरिया-एसीबी, औरंगाबाद- पोलिस अधीक्षक बुलढाणा

विश्वा पानसरे - पोलिस अधीक्षक रेल्वे नागपूर- पोलिस अधीक्षक गोंदिया

अरविंद साळवे- पोलिस अधीक्षक भंडारा- पोलिस अधीक्षक चंद्रपूर

वसंत जाधव- पोलिस उपायुक्त शीघ्र कृती गल, मुंबई- पोलिस अधीक्षक भंडारा

राकेश कलासागर- सीआयडी- पोलिस अधीक्षक हिंगोली

जयंत मीना- बदली आदेशाधीन- पोलिस अधीक्षक परभणी

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख