CM Punjab : राहुल गांधींना अंबिका सोनी म्हणाल्या, ''मुख्यमंत्रीपद नको रे बाबा''

अंबिका सोनी यांचे नाव सर्वात आघाडी होते. सोनी या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत.
Sarkarnama - 2021-09-19T112938.956.jpg
Sarkarnama - 2021-09-19T112938.956.jpg

चंदिगड : पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठीची लढाई सुरु आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. पंजाब काँग्रेसने काल  सांयकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. काँग्रेसने राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची (CM Punjab) सूत्रे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाकडे सोपवली, तर कोणाच्या चेहऱ्यावर नावे शिक्कामोर्तब होईल,  यात नवज्योतसिंग सिद्धूंसह 5 नेते आहेत, ज्यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये समाविष्ट आहेत. 

कॉग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी (Ambika Soni) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री विराजमान होण्यास नकार दिला आहे. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर काल रात्री उशीरा अंबिका सोनी यांच्या नावाबाबत चर्चा झाली. पण कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भेटल्यानंतर सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. अंबिका सोनी यांचे नाव सर्वात आघाडी होते. सोनी या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. 

चंद्रकांतदादा म्हणाले, ''मला कोण राज्यपाल करतंय''  
पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री  निवडीसाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने काल सायंकाळी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री निवडीचे अधिकार पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सोनिया गांधी यांनी माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.  

अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे 
नवज्योतसिंग सिद्धू , सुनील जाखड, प्रतापसिंह बाजवा, राजकुमार वेरका, रवनीत सिंग बिट्टू यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. कॉग्रेसच्या (congres) प्रथेप्रमाणे पक्ष आमदारांनी विधीमंडळ पक्ष नेता निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधींना (Sonia Gandhi) सोपविले असले तरी मुख्यमंत्री निवडीत राहुल गांधींचा शब्द अंतिम राहणार आहे. 

पंजाबची विधानसभा निवडणूक कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली होईल, असे कॉग्रेसतर्फे याआधी वारंवार सांगण्यात आले होते. असे असताना त्यांच्या गच्छंतीच्या निर्णयानंतर पंजाब कॉग्रेस एकसंघ राहण्याबाबत साशंकता वाढली आहे, असे असताना कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्या सारख्या प्रभावी नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून राहुल गांधींनी पक्षातील संघटनात्मक निर्णय प्रक्रियेवर आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com