अमरिंदरसिंग म्हणतात, " माझे ट्रॅक्‍टर मी पेटविले त्याचा इतरांशी काय संबंध ? ''  - Amarinder Singh says, "What does the fact that I set my tractor on fire have anything to do with others?" | Politics Marathi News - Sarkarnama

अमरिंदरसिंग म्हणतात, " माझे ट्रॅक्‍टर मी पेटविले त्याचा इतरांशी काय संबंध ? '' 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकांवरून कॉंग्रेस आक्रमक झाली असून आज नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नवी दिल्ली / चंडिगड : "" जर माझ्याकडे ट्रॅक्‍टर आहे आणि मी ते आगीत पेटविले असेल तर इतरांना त्याच्याशी काय देणं आहे? असा सवाल पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केला आहे. 

कृषी विधेयकांवरून कॉंग्रेस आक्रमक झाली असून आज नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एका ट्रॅकमधून आणलेले ट्रॅक्‍टर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेटवून आंदोलन केले. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे. ट्रॅक्‍टर पेटविण्याच्या घटने मुख्यमंत्री सिंग यांनी समर्थन केले आहे.

तसेच कृषी विधेयकावरून भाजपलाच खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, की मोदी सरकारने आणलेले हे विधेयक शेतकऱ्यांविरोधी आहे. आम्ही त्याला विरोधच करीत राहणार आहोत. या विधेयकाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. शेती हा राज्याचा विषय आहे. कृषी विधेयक आम्हाला म्हणजे कोणत्याही राज्यांना विचारता मंजूर केले गेले. हे विधेयक घटणाबाह्य असल्याचही त्यांनी म्हटले आहे 

मोदी सरकारने आणलेल्या कृषि विधेयकाविरोधात पंजाबचे मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. ज्या दिवशी हे विधेयक संसदेत मंजूर झाले त्या दिवसापासून सातत्याने ते या विधेयकाला विरोध करीत आहेत. पंजाबध्ये जे शेतकरी आंदोलन करीत आहेत त्यामध्ये कॉंग्रेसचेच कार्यकर्ते अधिक असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या टीकेकडे दुर्लक्ष करीत अमरिंदरसिंग हे शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. 

मोदी सरकारने आणलेल्या या तिन्ही विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कालच मोहर उठविली आहे. खऱ्या अर्थाने हे विधेयक मंजूर झाले असली तरी विशेषत: पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी मात्र याला विरोध करणे सोडले नाही. या विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विधेयकाबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी होत आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारने या आंदोलनांकडे दुर्लक्ष केले आहे. हे विधेयक कसे शेतकऱ्यांच्या हिताचे हे भाजपची मंडळी सांगत आहेत. 

इंडिया गेटजवळ आंदोलन करणाऱ्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका ट्रॅक्‍टर पेटवून दिला आहे. या घटनेप्रकरणी काही आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख