धक्कादायक : वाढदिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन - Alibag congress former mla madhukar thakur passed away  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

धक्कादायक : वाढदिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 जुलै 2021

आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो.

अलिबाग : वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर (वय ७४) यांचं निधन झालं आहे. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारात त्यांनी अखेऱचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजता त्याच्या मुळ गावी सातीर्जे (ता. अलिबाग) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  ठाकूर मागील तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. Alibag congress former mla madhukar thakur passed away 

झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग – उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष , प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

हेही वाचा : छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत..शिवसेनेची टिका

मुंबई : पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रोज महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणं कठिण होत चाललं आहे. या विषयावर आज 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. एकेकाळी महागाईवर घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर 'सामना'तून टिकास्त्र सोडण्यात आले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख