मृतकांच्या आकड्यातही गौडबंगाल..प्रशासन-स्मशानभूमीच्या माहितीत तफावत - Akola Funeral for 14 people killed by corona | Politics Marathi News - Sarkarnama

मृतकांच्या आकड्यातही गौडबंगाल..प्रशासन-स्मशानभूमीच्या माहितीत तफावत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

अकोला : गेल्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात मृतांचा आकडा देखील वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 

अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले  आहे.  दररोज रुग्णांचा बळी जात आहे, मात्र प्रशासनाकडून दर्शविण्यात येणारी मृतकांची संख्या आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या मृतकांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय तफावत दिसून आली. याची शहानिशा केली असता, मृतकांच्या आकड्यात गौडबंगाल असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. 

जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार काल दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली, परंतु दुपारपर्यंत स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १४ जणांवर अत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत आणि स्मशानभूमीतून मिळालेल्या मृतांच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळली.

नगरमध्ये एकाच दिवशी ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागण्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच उस्मानाबादमध्ये असंच चित्र दिसून आलं आहे. उस्मानाबाद शहरानजीकच्या स्मशानभूमीमध्ये काल एकाच दिवशी १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागाच शिल्लक नसल्याने अवघ्या एका फुटांवर सरण रचल्याचं विदारक दृश्य स्मशानभूमीत दिसत होतं. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख