पंजाबमध्ये ३३ टक्के दलित व्होट बॅक..अकाली दल-बसपाला मिळाल्या होत्या ११ जागा..

अकाली दलाला १० पैकी ८ जागा मिळाल्या होत्या.
Sarkarnaa Banner (16).jpg
Sarkarnaa Banner (16).jpg

नवी दिल्ली : पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी  पंचवीस वर्षानंतर एकत्र आले आहे. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पुन्हा अकाली दल-बसपाला मिळणार का, बाबत सध्या राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे. अकाली दल आणि बसपा यांनी १९९६ मध्ये लोकसभेची निवडणुक एकत्र लढविली होती. त्यानंतर आता २५ वर्षानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. पंजाबमधील १३ जागांपैकी ११ जागा मिळाल्या होत्या. मायावतीच्या नेतृत्वाखालील बसपाने तेव्हा तीन जागांवर विजय मिळविला होता. तर अकाली दलाला १० पैकी ८ जागा मिळाल्या होत्या.akali dal bsp form alliance ahead of punjab polls 

काही दिवसापूर्वी अकाली दल आणि बसपाच्या युतीबाबत सुखबीर बादल म्हणाले की, कॅाग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी (आप) यांना सोडून अकाली दल कुणाशीही युती करण्यास तयार आहे. आमचा भाजपसोबत युती करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सुखबीरसिंग बादल यांनी स्पष्ट केलं होतं.  पंजाबमध्ये ३३ टक्के दलित व्होट बॅक आहे. तर पंजाबात दलितांची संख्या ४० टक्के आहे. दोआबा क्षेत्रात २३ टक्के दलित व्होट बॅंक ही पक्षाचे राजकीय भवितव्य ठरवते.   

आज अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, बसपाचे महासचिव सतीश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढणार यांची माहिती दिली. सुखबीरसिंग बादल म्हणाले, "पंजाबमधील राजकारणाचा हा ऐतिहासिक दिवस आहे. अकाली दल आणि बसपा यांची विचारसरणी दूरदर्शी आहे. दोन्ही पक्ष हे कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. या युतीमुळे पंजाबची आर्थिक व्यवस्थेचा विकास होईल." "सुखबीरसिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये सरकार स्थापन होईल," असे सतीश मिश्रा यांनी सांगितले. 

यापूर्वी १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत अकाली दल आणि बसपा यांनी एकत्र निवडणूक लढविली होती. बसपा नेते कांशीराम हे विजयी झाले होते.  येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी काही महिन्यांपासून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली होती. जागा वाटपावरुन हा निर्णय झालेला नव्हता. आता अकाली दलाने बसपाला  २०  जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. सुखबीर बादल आणि मायावती यांच्यात याबाबत चर्चा झाली.   

पंजाबमध्ये असणारे ३३ टक्के दलित मते ही बसपाकडे आहेत. या माध्यमातून पुन्हा अकाली दल सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. गेल्या २५ वर्षापासून बसपाने पंजाबमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. पण त्यांना त्यात अधिक यश मिळाले नाही. विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी बहुजन समाज पक्ष (बसपा) २० जागा लढविणार आहे, तर अकाली दल ९७ जागा लढणार आहेत. 

यापूर्वी  गेल्या सप्टेंबरमध्ये  संसदने मंजूर केलेल्या  कृषी विधेयकाला विरोध करुन अकाली दलाने मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांनी मोदी सरकारमधून बाहेर पडून राजीनामा दिला होता. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन सुरु आहे. यात सर्वात जास्त शेतकरी हे हरियाणा आणि  पंजाब येथील आहे.   

Edited by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com