अजितदादांचा प्रश्न  ; मुलानं काय टि्वट केलं..हे तुम्ही पाहता का ?..अनेक जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत... - Ajit Pawar's question; Do you see what the boy tweeted  | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांचा प्रश्न  ; मुलानं काय टि्वट केलं..हे तुम्ही पाहता का ?..अनेक जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

अजित पवार म्हणाले, “पार्थने जे ट्विट केलं त्यावर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

पुणे : "तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता किंवा विचारता का?” असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी काल मराठा आरक्षणाबाबत एक टि्वट केलं होतं. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी उत्तर दिले.  अलिकडची मुलं काय टि्वट करतात, ते तुम्ही विचारतात का, अजित पवार म्हणाले, “पार्थने जे ट्विट केलं त्यावर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

तुमची मुलं काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता किंवा विचारता का? राज्याच्या अनेक विषयांची जबाबदारी माझ्यावर असते. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो. प्रत्येकानं काय टि्वट करावं, हा ज्याचा त्यांचा अधिकार असतो. मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण असेल किंवा अन्य समाजाचे आरक्षण असेल. ज्याला त्याला आपला न्याय हक्क मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. 

पार्थ पवार यांनी काल मराठा आरक्षणाबाबत टि्वट करीत आपण मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे म्हटलं होते. या टि्वटनंतर पार्थ पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी लढलं पाहिजे. यात लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी पार्थ पवार यांनी टि्वटमध्ये केली आहे. राज्याचे उपमुख्यामंत्री अजित पवार यांचे सुपुत्र  पार्थ पवार यांनी मराठा आरक्षण संदर्भाने तीन ट्वीट केले आहेत. या ट्वीटमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत . 

आरक्षण रद्द झाल्याने  मराठा समाजात अस्वस्थता दिसत असताना बीडच्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पार्थ यांनी आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचं ऐकून मी व्यथित झालो आहें  ही  घटना अत्यंत दुःखद आहे सरकारने याकडे गंभीरपणे पाहावे. सरकारन या प्रकरणात  तातडीनं लक्ष घालावं,' असं पार्थ यांनी म्हटलं आहे. विवेकच्या आत्यहत्यमुळे पेटलेल्या ठिणगीमुळे साऱ्या व्यवस्थेला आग लागेल. त्याच्यासारख्या लाखो तरुणांना न्याय मिळावा म्हणून मी प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करेल. अशा लाखो `विवेक`ना न्याय मिळवून देणे माझे कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. विवेकच्या मृत्यूने मी हादरून गेलो आहे. मराठा नेत्यांनो आता तरी जागे व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणीही पार्थ यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख