अजित पवार म्हणाले, ''नेतेच बनवाबनवी करतात..''

ते आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आम्ही साहेबांचेच आहोत.
gp7.png
gp7.png

मुंबई : ''मी तीस वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहतो आहे. ग्रामपंचायत निवडणुक ही पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नाही. कुठला सदस्य कुठल्या पक्षाचा हे कधी कळत नाही. कारण तिथं पक्षाचं चिन्हं नसतं. जे निवडून येतात. ते सांगतात आम्ही तुमच्याच पक्षाचे आहोत आणि काम करून घेतात.

आमच्या इथेही दोन गट उभे राहतात, जे निवडून येतात ते आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आम्ही साहेबांचेच आहोत,'' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने काल घेतला आहे. या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ग्राहकांचे हित लक्षात न घेता हा निर्णय घेतला असल्याचे विरोधकांचे मत आहे. 

या निर्णयावर  अजित पवार ते म्हणाले, ''ही सवलत ग्राहकांच्या फायद्याची आहे. या निर्णयाचा विकासकांची नाही तर ग्राहकांनाच फायदा होणार आहे, याबाबत विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे.'' राज्य सरकारचा कारभार किमान समान कार्यक्रमावर सुरू आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले. 

राज्य मंत्रिमंडळाने  जो निर्णय घेतला, त्यामुळे केवळ काही विकासकांनाच मोठा फायदा होणार आहे. कुठलीही सवलत द्यायला आमचा नकार नाही. कोरोनानंतरच्या काळात काही सवलती दिल्याही पाहिजेत. पण ज्या पद्धतीने ही सवलत देण्यात आली, त्याचे फायदे केवळ काही विकासकांना होणार आहेत, असे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

फडणीस म्हणाले की आम्ही जे आक्षेप नोंदविले होते, त्यावर त्यांनी एक निर्णय केला की, ज्या वर्षीचे दर अधिक असतील, तो आधार मानण्यात येईल. पण दुसरा जो निर्णय स्टँप ड्युटी बिल्डरने देण्यासंदर्भातील केला, त्याचा फारसा लाभ होणार नाही. कारण बिल्डरला मिळणारा फायदा आणि त्याला द्यावी लागणारी स्टँप ड्युटी यात फार मोठे अंतर आहे.

अजित पवार म्हणाले, ''कांजूरमार्ग जागेबाबत शहानिशा करण्यात येत आहे. तर ओैरंगाबाद नामातंराबाबत महाविकास आघाडीमध्ये वाद नाही.'' राज्य सरकारला जीएसटीची रक्कम प्रत्येक आठवड्याला मिळते. पण सध्या केंद्राकडून जीएसटीचा परतावा आलेला नाही. 

कृषी विभागाकडून ईडीने कागदपत्र मागितले आहेत, याबाबत ते म्हणाले की चौकशी करणाऱ्या एखाद्या संस्थेने कुठल्या काळातील कागदपत्रं मागावीत हा त्याचा अधिकार आहे. त्यांनी कागदपत्रं मागितली तर ती सादर करणं संबंधितांचं काम आहे. मी याबाबत कृषीमंत्र्यांशी बोलणार होतो, पण त्यांना कोरोना झाला आहे. याबाबत संबंधित सचिवांकडून माहिती घेणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com