पालिका, जिल्हा परिषदा जिंकण्याचा अजित पवारांनी सांगितला फंडा

प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टिने प्रयत्न करत आहे
Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

मुंबई : आपल्या मतांची विभागणी न होवू देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. (Ajit Pawar said about the Local self-government bodies)  

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र पणे लढवणार असल्याचे नेत्यांनी म्हटले आहे. कुणी काय मत मांडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न व अधिकार आहे. पण, उद्याच्या निवडणूकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की, स्वतंत्र लढवायची हा अधिकार तिथल्या स्थानिक नेत्यांना द्यावा, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

आपण इथे बसून ठरवले तर उदाहरणार्थ गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर इथली परिस्थिती काय असते ते माहित नसते. आपण त्यांच्यावर सोडले तर ते या सगळ्याचा सातत्याने विचार करतात, असेही अजित पवार म्हणाले. तिथले लोक रोज राजकारण आणि समाजकारण करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा मात्र, सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टिने प्रयत्न करत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत राज्यातील आगामी निवडणुका, निवडणुकांची रणनिती, ओबीसींचे राजकीय आरक्षण या विषयांवर चर्चा झाली. पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या मिटींगध्ये पराभूत उमेदवारांना बोलावले होते. त्याच प्रमाणे आमदारांनाही बोलावले होते. आमदारांची कामे करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, पराभूत उमेदवार असे म्हणाले की त्यांना विकासकामे करण्यासाठी निधी कमी प्रमाणात मिळतो. ही त्यांची अडचण आहे, असे पवार यांनी सांगितले. 

     

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com