मुंबई : "चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडली...आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत. 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही, हे भाजप नेत्याचं खरं दुखणं आहे, म्हणून भाजपचे नेते सारख्या काट्या पेटवतात.." अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "विरोधकांना नेहमी कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी 'सरकार पडणार पडणार ' असं म्हणावंच लागतं . कार्यकर्त्यांना कायम गाजर दाखवावं लागतं .शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे, तोपर्यंत सरकार मजबूत आहे."
ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात, त्यांचा निर्णय असतो, पवार साहेब यांनी या कारवाई बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. वीज बिलाच्या संदर्भात अभ्यास सुरू आहे. 59 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. गेल्या सरकारमुळे महावितरण अडचणीत आले आहे. कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. अजून नऊ महिने झालं तरी कोरोनावरची लस आली नाही. 29 हजार कोटी रुपये केंद्रकडून येणं बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून देखील नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभा राहील नाही," अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.
कोकाटे म्हणतात...पदवीधर विरुद्ध साखर कारखानदार अशी निवडणूक#Satara #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/1RVnfpODCW
— Sarkarnama (@SarkarnamaNews) November 25, 2020
हेही वाचा : अजित पवार यांना ईडीची नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही : संजय राऊत
मुंबई : "ईडीच्या चैाकशीला मी घाबरत नाही. अजित पवारांना नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालय आणि घरी ईडीने काल सकाळी छापा टाकत कारवाई केली. या धाडसत्रामुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की ईडी आता मोहेंजोदडो हडप्पा पर्यंत पोहोचले आहेत. मी वाटच बघतोय मला नोटिस कधी येईल. ही चौकशी पूर्ण होऊ दे. मग मीच ईडीला 100जणांची लिस्ट पाठवीन तेव्हा बघतो कोण किती कारवाई करतो. ईडी आता जुनी थडगी उकरून काढत आहेत. ईडीच्या चैाकशी कोणी घाबरत नाही. कोण घाबरतयं ते कळलचं. सुडाचं आणि बिनवुडाचं राजकारण फार काळ चालत नाही.
(Edited by : Mangesh Mahale)

