अजितदादा म्हणाले..आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?  - Ajit Pawar reaction regarding another Deputy Chief Minister post | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा म्हणाले..आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

अजित पवार म्हणाले की आणखी एक उपमुख्यमंत्री पद असे काही ठरलेले नाही. मी कालच हे सांगितलं, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? 

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद मिळणार का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

यावर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की आणखी एक उपमुख्यमंत्री पद असे काही ठरलेले नाही. मी कालच हे सांगितलं, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? 

अजित पवार म्हणाले की महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये. या दृष्टीने येत्या काळात पावले उचलली जातील. याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सारखच यश महापालिका निवडणुकात ही मिळेल. 

विधान परिषदेच्या आमदाराबाबत राज्यपाल अद्याप पर्यन्त निर्णय घेत नाही, त्यावर अजित पवार म्हणाले की, राज्यपालांनी आता अंत पाहू नये. मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिलेला आहे. याबाबत आता राज्यपालांची वेळ घेऊन चर्चा करणार आहोत. आमचं 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ राज्याने कमी करावी, अशी मागणी भाजपचे नेते करीत आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, आधी केंद्राला टॅक्स कमी करायला सांगा. मग आम्ही विचार करू, असे अजित पवार म्हणाले. 

धनंजय मुंडे प्रकरणाबाबत ते म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी काल धनंजय मुंडे यांच्या मुलांचे जबाब घेतलेला आहे. यात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही.

एल्गार परिषदेबाबत अजित पवार म्हणाले की, त्यामध्ये एकाने जे विधान केले. ते अजिबात योग्य नाही. त्यासंदर्भात आता गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस त्यांच काम करतील. घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे संविधाना प्रेमाने जर चुकीचे काही बोलले असतील. तर त्याच्यावर कारवाई होईल. पण भाषण करणार्‍यांनी तारतम्य ठेवून भाषण करायच असते. तिथे अनेक मोठ मोठी लोक होती. त्या व्यासपीठावर न्यायाधीश म्हणून काम केलेली व्यक्ती होती. त्यावेळी ते भाषण करीत असताना. थांबवयाला पाहिजे होत. हे भाषण आपल्या देशाला योग्य नाही. आपल्या देशात अनेक समाजातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. यामुळे देशात तेढ आणि द्वेष निर्माण होईल, अस त्यावेळी बोलायला पाहिजे नव्हते

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख