POK तील अतिरेकी तळांवर भारताचा हवाई हल्ला ही `फेक न्यूज`

सुरक्षा दलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा!
air strike on POK
air strike on POK

नवी दिल्ली :  भारताने आज पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हवाई हल्ले केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. मात्र त्याचे खंडन लष्कराने केले आहे. गेल्याच आठवड्यात अतिरेक्यांच्या तळांवर भारताने हल्ले केले होते. अनेक वाहिन्यांनी आणि पत्रकारांनी याबाबत ट्विट केले होते. मात्र असे काही नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

#WATCH LIVE: Inspector General of Police, Jammu Zone addresses the media #JammuAndKashmir https://t.co/pUzfQQsFh3

गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानी सैन्य जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी सोपी व्हावी यासाठी सीमेवर वारंवार गोळीबार करत आहे. नियंत्रण रेषेवर भारतीय नागरिकांवरही गोळीबार केला जात आहे. 2019 च्या तुलनेत यंदा गोळीबाराचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यामुळे भारताने कठोर कावाईचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोळीबारात  2019 मध्ये 18 तर यंदा आतापर्यंत 21 नागरिकांनी प्राण गमावले. 

घुसखोरी करून दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत आलेल्यांच्या विरोधात  भारताने आज मोठी कारवाई जम्मू-काश्मीरमध्ये केेली. ट्रकमधून दहशतवादी हल्ला करण्यासाठी आलेल्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी गुरूवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील नारगोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत ठार केले. त्यांच्याकडून 11 एके 47 रायफल्स, तीन पिस्तूल, 29 हॅंडग्रेनेड जप्त करण्यात आले. ही मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com