बंडा तात्यांना पाठविले फलटणच्या मठात  - agitation was postponed on the suggestion BandaTatya Karadkar | Politics Marathi News - Sarkarnama

बंडा तात्यांना पाठविले फलटणच्या मठात 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

बंडातात्या कराडकरांना  सकाळी ताब्यात घेतल्यानंतर च-होली येथील संकल्प मंगल कार्यालयात पोलिसांच्या नजरकैदमध्ये ठेवण्यात आले होते.

पुणे : ह.भ.प. बंडा तात्या कराडकर Banda Tatya Karadkar यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर च-होली येथील संकल्प गार्डन येथे सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. बंडा तात्या कराडकर यांना फलटण येथील त्यांच्या गुरुकुलमध्ये पाठविण्यात आल्याचे समजते. ''बंडा तात्यांच्या सूचनेनंतर आम्ही हे आंदोलन स्थगित करीत आहोत," असे आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सांगितले.  
 
यंदाही राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं होतं.  त्यांना अज्ञास्थळी हलविण्यात आले होतं. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत पोलिस प्रशासनाशी चर्चा केली होती.  

बंडातात्या कराडकरांना  सकाळी ताब्यात घेतल्यानंतर च-होली येथील संकल्प मंगल कार्यालयात पोलिसांच्या नजरकैदमध्ये ठेवण्यात आले होते. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं काल बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथं पोहचले. मग मात्र पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं होतं. बंडा तात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर वारकऱ्यांनी संकल्प गार्डन येथे भजन आंदोलन सुरू केलं होते.  

संभाजीराजे म्हणाले, ''मला मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो''

बीड  : ''मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसीमध्ये आरक्षण द्या. हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा , मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनाही हा प्रश्न विचारायचा. आणि जर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल,  तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा,'' असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजेंनी बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख