पुलवामा हल्ल्यानंतर माझ्यावर टीका करणारे आता उघडे पडले, मोदींकडून विरोधकांचा समाचार  - After the Pulwama attack, my critics were now exposed, the news of the opposition from Modi | Politics Marathi News - Sarkarnama

पुलवामा हल्ल्यानंतर माझ्यावर टीका करणारे आता उघडे पडले, मोदींकडून विरोधकांचा समाचार 

वृत्तसंस्था
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

शेतकरी, कष्टकरी, मजूरासह भारत संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर बनत आहे. कोणाला जशास तसे उत्तर देण्यास आमचा जवान सज्ज आहे असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले  
 

अहमदाबाद : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित जे निमलष्करी दलाचे जवान परेड करीत आहेत त्यांना पाहून मला पुलवामा दहशतवादी हल्ल्याची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. या हल्ल्यात निमलष्करी दलाचे जवान शहीद झाले होते.

भारतमातेच्या रक्षणासाठी त्या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. ती कदापी विसरता येणार नाही असे सांगत भारतापुढेच नव्हे तर संपूर्ण जगासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. 

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर एकता दिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे तर कालपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. युनीटी ऑफ स्टॅच्यू येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. प्रारंभी त्यांनी सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर झालेल्या सभेत मोदी यांनी सरदार पटेल यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. 

मोदी यांनी देशातील कोणत्याही विरोधकांचा नामोल्लेख न त्यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, "" पुलवामा हल्ल्यानंतर त्यावेळी काही लोक देशाच्या दु:खात सहभागी झाले नाहीत. देशासाठी माझे जवान शहीद झाले होते. कोणी पुत्र, कोणी भाऊ गमावला होता. त्यावेळी बऱ्याच मंडळींनी केलेली विधान मी आजही विसरलेलो नाही.

त्यावेळी मला कोणताही वाद घालायचा नव्हता. वादापासून मी दूर राहिलो. मात्र माझ्या हद्‌यावर शहीद जवानांचा घाव होता. ज्यावेळी जे लोक माझ्यावर टीका करीत होते ते आता उघडे पडले आहेत. पाकिस्तानातील त्यांचेच लोक काय म्हणत आहे. हे माझ्यावर टीका करणाऱ्यांच्या कानावर गेले असेल. 

आज सरदार पटेल यांच्या साक्षीने मी संपूर्ण देशाला हे सांगू इच्छितो, की देशाच्या सुरक्षेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही. भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनत आहेत. देशाच्या सीमेवर तर आमच्याकडे कोणी वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत करणार नाही असे स्पष्ट करून मोदी म्हणाले, की देशात नव्या बदलाचे वारे वाहत आहे. सीमेवर आम्ही चांगले रस्ते, ब्रीजेस बांधले आहेत. स्वसंरक्षणासाठी आम्ही सज्ज आणि कटिबद्ध आहोत. 

आपल्या भारताचा गौरव संपूर्ण जग करतो याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रगती आणि विकासाचे आव्हान आमच्या समोर निश्‍चितपणे आहे. काही लोक मात्र दहशतवादाला साथ देत आहेत. संपूर्ण जगाची चिंता ही दहशतवादाचीच आहे

याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, की भारत एकसंघ आहे. येथे विविध जाती धर्म आहेत. येथे आदरभाव, बंधुप्रेम, शांती, संस्कृती आहे हीच आमची ओळख आहे. भारतानेही दहशतवादाची किंमत मोजली आहे. मात्र आम्ही दहशतवाद्यांना मुँहतोड उत्तर दिले आहे. आम्ही एक आहोत.अद्वितीय आहोत आणि अपराजित आहोत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख