कंगनापाठोपाठ मदन शर्मांच्या पाठिशी रामदास आठवले, घरी जावून घेतली भेट !  - After Kangana, Ramdas remembered Madan Sharma's support, went home and met him! | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनापाठोपाठ मदन शर्मांच्या पाठिशी रामदास आठवले, घरी जावून घेतली भेट ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

कंगनाप्रकरण सुरू असतानाच माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट शेअर केल्याने शिवसैनिकांचे पित्त खवळले होते.

मुंबई : "" केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेने मारहाण केलेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांची आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. 

आठवले यांनी तसे ट्‌विट केले आहे. आठवले हे सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनीही कधी नव्हे इतके शिवसेनेला आणि ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिचे घर पाडल्यानंतर आठवले यांनी कंगनाची तिच्या घरी जावून भेट घेत घर पाडल्याच्या घटनेचा धिक्कार केला होता.

त्यांनी कंगनाला पाठिंबा दिला होता. घर पाडल्यानंतर कंगना जेव्हा हिमाचल प्रदेशमधून मुंबईत दाखल झाली त्यावेळी आठवले यांच्या पक्षाचे कार्यकर्ते कंगनाचे संरक्षण करण्यासाठी विमानतळावरही गेले होते. 

कंगनाप्रकरण सुरू असतानाच माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट शेअर केल्याने शिवसैनिकांचे पित्त खवळले होते. काही शिवसैनिकांनी मदन यांना मारहाण केली होती.

या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला इजा झाली होती. या मारहाणीनंतर भाजपची मंडळी आक्रमक झाली आहेत. त्यांनी शिवसेनेवर सडकून टीकाही केली होती. आजही या मुद्यावर शिवसेनेला भाजपने घेरले आहे. आठवले हे शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवित आहेत. 

दरम्यान, मदन शर्मा यांनी आज दुसऱ्या दिवशी ट्विट करून उद्धव ठाकरेंविरोधात टीका केली. ते म्हणतात, जर तुम्ही सरकार चालवू शकत नसाल तर राजीनामा द्या अशी माझी विनंती आहे. 

लोकांना राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणारे सरकार निवडू द्या. जर उद्धव ठाकरे आपण सरकार चालवू शकत नसाल तर आपण राजीनामा द्यायला हवा अशी माझी विनंती आहे. कंगना राणावतच्या पाठोपाठ आता शर्मा हे ही ठाकरे सरकारला लक्ष्य करीत आहे. 

े शर्मा यांना काही शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर विशेषत: भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे अतुल भातखळकर, राम कदम, प्रवीण दरेकर आदींचा समावेश होता. तर आज शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शर्मा यांना करण्यात आलेल्या मारहाणीचे समर्थन करतानाच त्या शिवसैनिकांनी योग्यच केल्याचे म्हटले होते. 

राऊत यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर अधिकच टीका होऊ लागली आहे. तसेच त्यांनी मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे यांनाही साद घातली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख