लष्कर सरसावले : जर्मनीतून विमानाने आणणार अॅाक्सीजन उत्पादक यंत्रणा - AFMS has decided to import oxygen generation plants and containers from Germany | Politics Marathi News - Sarkarnama

लष्कर सरसावले : जर्मनीतून विमानाने आणणार अॅाक्सीजन उत्पादक यंत्रणा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

लष्कराकडून जमर्नी येथून 23 अॅाक्सीजन जनरेशन प्लँट आणि कंटेनर आणले जाणार आहेत. 

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने देशावरील अॅाक्सीजन तुटवड्याचे संकट अधिक गडद होत चालले आहे. रुग्णालयांपर्यंत अॅाक्सीजन पोहचविण्यासाठी सरकारी यंत्रणेचा कस लागत आहे. तरीही अनेक ठिकाणी दररोज अॅाक्सीजनची कमतरता जाणवत आहे. रुग्णालयांना अॅाक्सीजन मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय लष्कर पुढे सरसावले आहे. लष्कराकडून जमर्नी येथून 23 अॅाक्सीजन जनरेशन प्लँट आणि कंटेनर आणले जाणार आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत 3 लाख 32 हजार 730 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळ देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 62 लाखांवर पोहचला आहे. चोवीस तासांत देशात 2 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृत्यूचा आकडा 1 लाख 86 हजारांहून अधिक झाला आहे. मागील काही दिवसांत बाधित रुग्ण वाढू लागल्याने अॅाक्सीजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. 

लष्कराच्या लष्करी वैद्यकीय सेवा यांच्या वतीने देशातील त्यांच्या रुग्णालयांमध्ये अॅाक्साजीन प्लँट बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जर्मनी येथून 23 प्लँट व कंटेनर विमानाने भारतात आणले जाणार आहेत. हे प्लँट आठवडाभरात भारतात पोहचण्याची शक्यता आहे. 

या प्लँटमधून 24 तासात 40 लिटर आणि प्रति तास 2400 लिटर अॅाक्सीजनचे उत्पादन शक्य होणार आहे. त्यानुसार 24 तासांत 20 ते 25 रुग्णांना आवश्यक अॅाक्सीजन पुरविता येईल. हे प्लँट कधीही कुठेही बसविले जाऊ शकतात, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सध्या 23 प्लँट आयात केले जाणार असल्याने अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे. 

नितीन गडकरींनी 300 व्हेंटिलेटर मिळवले

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. रुग्णांना अॅाक्सीजन बेडसाठी धावपळ करावी लागत असून व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक हजार व्हेंटिलेटर देण्याचे मान्य केले आहे. 

महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याने बेड अपुरे पडू लागले आहेत. व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धावून आले आहेत. त्यांनी एका फोनवर आंध्र प्रदेश सरकारकडून 300 व्हेंटिलेटर मिळवले आहेत. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख