अनुराधा पैाडवाल यांचा मुलगा आदित्य पैाडवाल याचं निधन - Aditya Paudwal son of Anuradha Padwal passed away | Politics Marathi News - Sarkarnama

अनुराधा पैाडवाल यांचा मुलगा आदित्य पैाडवाल याचं निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

अनुराधा पैाडवाल यांचा मुलगा आदित्य पैाडवाल (वय35) याचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ गायिका अनुराधा पैाडवाल यांचा मुलगा आदित्य पैाडवाल (वय35) याचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. दिवंगत संगीतकार अरूण पैाडवाल आणि अनुराधा पैाडवाल यांचा आदित्य हा मुलगा.  मूत्रपिंड निकामी झाल्याने त्याचे निधन झाले. काही दिवसापूर्वी त्याला उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल केलं होतं. उपचार सुरू असताना त्याचं निधन झालं. आदित्य हा संगीतक्षेत्रात कार्यरत होता.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील 'ठाकरे' या सिनेमातील 'साहेब तू' या गाण्याचा निर्माता म्हणून आदित्य याने काम केले होतं. संगीतकार म्हणून आदित्य याने स्वतःची ओळख निर्माण केली होती. प्रसिध्द चित्रपटसमीक्षक दिलीप ठाकूर यांनी टि्वट करून आदि्त्यच्या लहानपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

दिलीप ठाकूर आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की अरुण पौडवाल आणि अनुराधा पौडवाल खूप गप्पिष्ट. पूर्वी खारच्या त्यांच्या घरी जाणे झाले की हा छोटासा आदित्य छान हसून स्वागत करणार. त्यानेही संगीत वारसा जपला.... आज वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्याच्या जाण्याचे वृत्त प्रचंड धक्कादायक. दुर्दैव.

हेही वाचा : महिला पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींनी झापले, शीतयुद्ध पेटणार !
नागपूर : यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी झालेली निवड सुरुवातीपासून वांद्यात सापडली आहे. यामध्ये मोठे अर्थकारण झाल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतील चारही महिला पदाधिकारी या समितीवर आहेत. एका वादग्रस्त आणि विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची या पुरस्कारासाठी निवड केल्याने पक्षश्रेष्ठींनी महिला पदाधिकाऱ्यांना झापले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पदाधिकारी आता एक दुसऱ्याकडे बोट दाखवीत आहेत. महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले असून नजीकच्या काळात ते पेटणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे. आदर्श पुरस्कारासाठी झालेल्या निवडीवरून शिक्षकांमध्ये नाराजी आहे. यातच विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची निवड करण्यावरून जिल्हा परिषदेची चांगलीच किरकिर सुरू होत आहे. काही प्रकरणांवरून मतभेद निर्माण झाल्याने त्यांच्यात दोन गट पडले असल्याची चर्चा आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख