अभिनेत्री पायल घोषचा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश - Actress Payal Ghosh joins Republican Party in the presence of Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अभिनेत्री पायल घोषचा रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री पायल घोष हिने आज रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पक्ष महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी पायलची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई : अभिनेत्री पायल घोष हिने आज रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायल घोषने पक्षात प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पक्ष महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी पायलची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. सिने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर पायल घोष ही चर्चेत आली होती. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी पायल घोषने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते. 

सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली होती. याप्रकरणी रामदास आठवले यांनी पायलला पाठिंबा दिला होता. अनुराग कश्यप यांच्यावर  केलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून त्वरित त्यांना मुंबई पोलिसांनी अटक करायला पाहिजे होते मात्र अद्याप तशी कारवाई झालेली नाही. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

कंगना राणावत प्रमाणेच अभिनेत्री पायल घोष यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून पायल यांनी घाबरू नये, असे आश्वासन आठवले यांनी पायल घोष यांना दिले होते. याबाबत पायल घोष हिच्याशी दूरध्वनीद्वारे रामदास आठवले यांनी चर्चा केली होती. आठवले यांनी पायल घोषची भेट घेऊन तिला पाठिंबा दिला होता.  

बॉलिवूडमध्ये स्ट्रगलर्स असणाऱ्या कलाकारांचा निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी गैरफायदा घेण्याचे काही ठिकाणी प्रकार होत असतील तर ते रोखण्यासाठी अभिनेत्री पायल घोष यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हिंदी सिनेसृष्टीत काही प्रमाणात होत असलेले गैरप्रकार या चौकशीमुळे थांबतील असे आठवले यांनी स्पष्ट केले आहे. 

लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टिका केली नसून राज्यसरकार वर टिका केली आहे. टिका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना राणावत यांना भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगनाला संरक्षण देईल, असे काही दिवसांपूर्वी आठवले म्हणाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख