हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा - Activists of Sambhaji Brigade entered Hasan Mushrif press conference | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

मुश्रीफ यांनीही या घोषणांना प्रतिसाद देत कार्यकर्त्यांना पाठबळ दिले.

कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडचे Sambhaji Brigade कार्यकर्ते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif  यांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले आणि एकच खळबळ उडाली.  ''छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा - लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे,'' अशा जोरदार घोषणा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.  तब्बल दहा मिनिटे सुरू असलेल्या या घोषणाबाजीमुळे पत्रकार परिषद काही वेळ थांबवावी लागली.

येथील शासकीय विश्रामगृह मध्ये विविध विषयांवरील बैठक झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षण, भाजपच्या काळात झालेल्या रस्त्यामधील गैरव्यवहार तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करत असतानाच अचानक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सभाग्रहात जोरदार घोषणा देत आले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा जोरदार घोषणा दुमदुमू लागल्या. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनीही या घोषणांना प्रतिसाद देत "एक मराठा, लाख मराठा" "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा जोरदार घोषणाही देत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. अधिवेशनामध्ये ही या विषयावर आपण चर्चा करणार असल्याची ग्वाही ही श्री मुश्रीफ यांनी दिली. तब्बल दहा मिनिटे सुरू असलेल्या या घोषणाबाजीमुळे पत्रकार परिषद काही वेळ थांबवावी लागली.

आघाडीतील वाद चव्हाट्यावर ; पटोलेंचा ‘लेटरबॉम्ब’ 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पाठविलेल्या पत्रानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  हे पद काँग्रेसकडे असून, अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ५ आणि ६ जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यावी अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केली आहे. एका खात्याने काढलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे अधिवेशनाआधीच काँग्रेसनेच विरोधकांच्या हाती कोलीत दिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख