हक्कभंग प्रस्ताव स्वीकारा अन्‌ मला तातडीने बोलवा : सुनील तटकरे 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे.
Accept the infringement proposal and call me immediately: Sunil Tatkare
Accept the infringement proposal and call me immediately: Sunil Tatkare

दापोली : दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात विधानसभेचे सभापती नाना पटोले यांच्याकडे 20 ऑक्‍टोबर रोजी हक्कभंग प्रस्ताव सादर केला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका आमदाराने खासदाराच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. 

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार असून शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे या सरकारचे घटक पक्ष असतानाही हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याने राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

या प्रस्तावानंतर खासदार सुनील तटकरे यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. आमदार योगेश कदम यांचे नाव न घेता ते म्हणाले की, त्यांनी माझ्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष, पाच वेळा आमदार व आता लोकसभेचा सदस्य अशा वेगवेगळ्या भूमिकेत काम करत असताना या पद्धतीचा हक्कभंग त्यांनी दाखल केला आहे. 

माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समज गैरसमजाचा संदेश जाता कामा नये; म्हणून मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना विनंती करणार आहे, की त्यांनी ही हक्कभंगाची नोटीस तातडीने स्वीकरावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेत मला लोकसभेचा सदस्य म्हणून बैठक बोलावण्याचा अधिकार आहे की नाही ते त्यांनी तपासून पहावे आणि त्यांनी मला त्वरित नोटीस काढावी. मी त्याला उत्तर देणार नाही, असेही खासदार तटकरे यांनी सांगितले. 

मी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे. म्हणूनच हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून घेऊन माझ्यावर जी काही कारवाई करायची, असेल ती करण्यात यावी. पाच वर्षे महाराष्ट्रात भक्कमपणे सरकार टिकवायचे आहे, त्यामुळे हे महान देशभक्त दुर्दैवाने जे टीका टिप्पणी करत आहेत. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असेही खासदार तटकरे यानी स्पष्ट केले. 

आघाडी धर्माला तिलांजली 

काही महिन्यांपूर्वी आपण मंडणगड येथे गेलो असताना तेथे शिवसेनेचे काही स्थानिक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पण, आपण त्याला कडाडून विरोध केला होता. पण, नंतरच्या कालावधीत मात्र आमचे दापोली पंचायत समितीचे सभापती राऊफ हजवानी यांच्या पत्नीला शिवसेनेत प्रवेश देत त्यांनी आघाडीच्या धर्माला तिलांजली देण्याचे काम केले असेही तटकरे यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com