भाजपची २४ तासांत परतफेड; शिवसेनेचे १० नगरसेवक फोडले  

जळगावमध्ये शिवसेनेने भाजपचे ६ नगरसेवक बुधवारी फोडले होते.
 10 Shiv Sena corporators join BJP .jpg
10 Shiv Sena corporators join BJP .jpg

रायगड : जळगावमध्ये शिवसेनेने भाजपचे ६ नगरसेवक बुधवारी फोडले होते. त्याचा वचपा भाजपने (Bjp) माथेरानमध्ये काढला आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात सत्ता असतानाही शिवसेनेचे (Shiv Sena) नगरसेवक फुटल्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (10 Shiv Sena corporators join BJP)

माथेरान नगरपालिकेत १४ नगरसेवक आहेत. १४ पैकी १४ नगरसेवक हे शिवसेनेचेच होते. त्यातील १० जणांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले आहे. या नगरसेवकांसोबतच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेवकांना भाजपमध्ये आण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. ठाकूर यांच्या कार्यशैलीमुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

भाजपच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत माथेरान नगरपरिषदेतील  १४ पैकी १० नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे  अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे. 

मुक्ताईनगर नगर परिषदेतील भाजपच्या १० नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या नगरसेवकांना शिवसेनेत आणले होते. मात्र, भाजपने आज याचा वचपा काढला आहे. यातील बरेच नगरसेवक हे खडसे समर्थकच होते. गेल्या निवडणुकीत ते भाजपकडून (Bjp) निवडून आले होते. 

खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हे संबंधित नगरसेवक राष्ट्रवादीत जाणे अपेक्षीत होते. मात्र, दोन्ही पाटलांनी योग्य खेळी करत त्यांना शिवसेनेत आणले. या नगर परिषदेत एकून १७ नगरसेवक असून नगराध्यक्षपद भाजपकडेच होते. याशिवाय १४ नगरसेवक भाजपचे आणि चार शिवसेनेचे होते. भाजपच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी शिवेसनेत प्रवेश केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com