असदुद्दीन ओवैसींच्या दाव्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले खंडन -  om prakash rajbhar refutes asaduddin owaisi claim says no talks on 100 seats with aimim | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

असदुद्दीन ओवैसींच्या दाव्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले खंडन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

ओवेसीं यांच्याशी कुठलाही संवाद झाला नसल्याचे राजभर यांनी स्पष्ट केलं.

नवी दिल्ली  :  सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP) चे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याचा दाव्याचे खंडन केलं आहे. याबाबत ओवेसीं यांच्याशी कुठलाही संवाद झाला नसल्याचे राजभर यांनी स्पष्ट केलं आहे. om prakash rajbhar refutes asaduddin owaisi claim says no talks on 100 seats with aimim

ओमप्रकाश राजभर म्हणाले की, ओवेसींनी उत्तरप्रदेशात शंभर जागा लढविण्याविषयी इच्छा व्यक्त केली आहे. आमची त्यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. उत्तरप्रदेशात भाजपसोबत लढतांना मित्रपत्रांची किती क्षमता आहे, याचा अभ्यास केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. ओवेसींनी शंभर जागा लढण्याची केवळ इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत कुठलाही फॅामुला ठरलेला नाही. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी ४०३ विधानसभा जागा लढविणार आहे. ही निवडणुक खूप महत्वाची आहे. आम्ही जागावाटपाबाबत कोणतीही घाई करणार नाही.

बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधकांची चांगली दमछाक करणाऱ्या आँल इंडिया मजजिल-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन(एआयएमआयएम) आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत एआयएमआयएम शंभर जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी दोन दिवसापूर्वी केली होती. 

उत्तर प्रदेशात ओवैसी बहुजन समाज पक्षासोबत युती करणार असल्याची चर्चा होती, यानंतर ओवैसींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब' याच्या भागीदारी संकल्प मोर्चा' सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही."

 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करणार असल्याचे म्हटलं होते. या बातम्याचे खंडना ओवैसींनी केलं. त्यांनी टि्वट करीत आपली भूमिका मांडत या चर्चा खोट्या असल्याचे म्हटलं आहे.  
 
असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, "मला उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे."  "आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब' याच्या भागीदारी संकल्प मोर्चा' सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही." असं टि्वट त्यांनी केलं होते. बिहारमध्ये एआयएमआयएमने २० जागा लढविल्या होत्या. यातील पाच जागांवर त्यांना विजय मिळाला होता. 
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख