बांदलांना पुन्हा अटक..धरण प्रकल्प जमिन व्यवहारप्रकरणी शहानिशा सुरू.. 

बांदलांच्या विरोधात सध्या अनेक तक्रारी शिक्रापूर पोलिसांकडे प्राप्त होत आहेत.
1bandalffff.jpg
1bandalffff.jpg

शिक्रापूर  :  पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना काल शिक्रापूर पोलिसांनी रवींद्र सातपूते यांच्या तक्रारीवरुन दाखल गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. आज  (ता. ५) त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. दरम्यान बांदलांसंदर्भात विविध धरण प्रकल्पांच्या जमिन व्यवहारांमधील तक्रारी शिक्रापूर पोलिसांकडे आलेल्या असून त्यांचीही शहानिशा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शेडगे यांनी दिली. 
 Mangaldas Bandal will be produced in court today

  
२६ तारखेपासून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बांदलांना पहिली पोलिस कोठडी १ तारखेला संपल्यावर होईल, असे वाटत असताना त्यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झाल्याने त्यांची रवानगी एकसारखी पोलिस कोठडीत होत आहे. दरम्यान काल त्यांना मंदार पवार (तळेगाव-ढमढेरे, ता.शिरूर) यांच्या फसवणूकीप्रकरणी कृष्णा विरोळे व बांदलांवर दाखल गुन्ह्यातील पोलिस कोठडीची मुदत काल संपताच शिक्रापूर पोलिसांनी रवींद्र सातपूते फसवणूकप्रकरणी त्याचा ताबा घेतला.  आज (ता. ५) शिरुर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी हेमंत शेडगे यांनी दिली.

बांदलांच्या विरोधात सध्या अनेक तक्रारी शिक्रापूर पोलिसांकडे प्राप्त होत आहेत. मात्र, आलेल्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करुन त्यावर पुढील कार्यवाही आमचेकडून होत असल्याची माहिती शेडगे यांनी दिली. या शिवाय चासकमान प्रकल्प पुनर्वसन जमिनींच्या बाबतीत बांदल तसेच शिक्रापूरातील काही जणांविरोधात काही तक्रारी आमचेकडे आलेल्या आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांना तसे आम्ही कळविलेले आहेत. जमिनींबाबतची प्रकरणे किचकट असल्याने त्याची शहानिशा, कायदेशीर बाजु आणि यातील काही प्रकरणे उच्च न्यायालयातही दाखल असल्याने सर्व बाजूंचा विचार करुन हे प्रकरणे गुन्हे म्हणून दाखल करण्याची प्रक्रीय पुढील काळात सुरू होवू शकते असेही शेडगे यांनी दिली.

पुढील तीन महिने ’रेड-मन्थ...’
     
बांदलांची बहुतांश सर्व प्रकरणे शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेशी संबंधित आहेत. आम्ही दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने बॅंकेकडून बांदलांसह शिक्रापूरातील संशयित अनेकांची खाते स्टेटमेंट मागविलेली आहेत. या सर्व खात्यांतील गेल्या अनेक वर्षांतील व्यवहारांची शहानिशा आम्ही करणार आहोत. पुढील तिनं महिने या चौकशीत कोण-कोण बोगस लाभार्थी, बनावट पध्दतीने या व्यवहारांमध्ये सामिल आहेत त्याची इत्थंभूत माहिती आम्ही संकलीत करीत असल्याने पुढील तीन महिने ’रेड-मन्थ’ असून अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत. जसे कागदावर सापडतील तशी या गुन्ह्यांतील सहभागी मंडळी आम्ही उचलणार असल्याचेही शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com