कणकवली : माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या पक्षातील अकरा नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. वर्षभर आजारपण नव्हतं तर मंत्री पद न मिळाल्याने नाराजीचे कारण होते. गेले ५ वर्षे दीपक केसरकर भाजपच्या संपर्कात होते, आम्ही सांगत होतो. त्याची त्यांनी कबुली दिली. केसरकर मंत्रीपद न मिळाल्याने वर्षभर जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यात आले असल्याची टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. चांदा ते बांदा योजना बंद करत सिंधू रत्न योजना मुख्यमंत्र्यांनी आणली. तेव्हा मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंवर प्रेम करतो ते आता दाखवून केवळ हा दिखाऊपणा करत आहे. केसरकरांना बाजूला करण्यात खासदारांचा हात असल्याचे बोलले जात आहे. कारण स्वतःच खासदार काहीजणांना बोलत आहेत. खासदारकी गटबाजी करतात, हे मी तेव्हा सांगत होतो, ते आता आमदार दीपक केसरकर सांगताहेत. त्यामुळे काल आजू बाजूला बसलेले शिवसेना पदाधिकारी घाबरले आहेत, असा टोला उपरकर यांनी लगावला आहे.
केसरकर राष्ट्रवादीत असल्यापासून पालकमंत्र्यांवर राग आहे. तो राग पुन्हा मंत्री पद गेल्यामुळे वाढला, त्याची उजळणी काल करत दाखवला. जिल्ह्यात मंत्रीपद असायला हव आहे. वैभव नाईक यांना मंत्री केलं असतं तर त्याला माझा विरोध नव्हता, असे आता केसरकर सांगत आहेत. पण त्यावेळी कुठेही बोलताना दिसले नाही. या भांडणात शिवसैनिक चितेंत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक भरडला जात असल्याचा दावा परशुराम उपरकर यांनी केला आहे.
दीपक केसरकर पालकमंत्री व उमेदवार असताना जनतेला दिलेल्या आश्वासने विसरले आहेत. चष्मा कारखाना, आयटी पार्क, ८०० मुलांना नोकऱ्या व अन्य आश्वासनाचे काय झाले ? केलेल्या घोषणा केव्हा पूर्ण करणार ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे.
माजी मंत्र्याच्या दाव्यामुळे उडाली खळबळ...#Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #MadhyaPradesh #ByElection #JyotiradityaScindia #BJP #Congress #Viral #ViralNewshttps://t.co/vy8CSDnYL7
— Sarkarnama (@MySarkarnama) November 1, 2020
हेही वाचा : मला मोदींसमोर नेले होते...पण मी शिवसेनेत गेलो
सावंतवाडी : "मी जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली, तेव्हा मला अनेक पक्षातून ऑफर आल्या होत्या. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नेले होते. मला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर होती; मात्र मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो. त्यामुळे मी शिवसेना सोडणार नाही,' असे माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.ते म्हणाले, कोरोना विरोधातील लढाईस प्राधान्य दिले पाहिजे. सिंधुदुर्ग शंभर टक्के कोरोनामुक्त जिल्हा होण्यासाठी यापुढेही प्रयत्न केले जावेत. माझ्या आमदार निधीतील निधी त्यासाठी देण्यास तयार आहे, असे आमदार केसरकर म्हणाले.

