'फ्लाईंग सिख'  मिल्खा सिंह यांचे निधन

काही दिवसापूर्वी ते कोरोनामुक्त झाले होते.
Sarkarnaa Banner (39).jpg
Sarkarnaa Banner (39).jpg

नवी दिल्ली :  धावपटू ' फ्लाईंग सिख'  मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे  काल रात्री ९१व्या वर्षी निधन झाले. मिल्खा सिंह यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. काही दिवसापूर्वी ते कोरोनामुक्त झाले होते. त्यांची तब्बेत अचानक खालावल्याने त्यांना चंदिगडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. flying sikh milkha singh has passed away काल (१८ जून)  रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

गेल्या आठवड्यात त्यांची पत्नी निर्मल कौर मिल्खा सिंह (८५) यांचे कोरोनामुळे निधन झाले.  त्यावेळी आयसीयूमध्ये असल्याने त्यांना पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीत राहता आले नाही.  प्रसिद्ध गोल्फपटू जीव मिल्खा सिंह हे त्याचे चिंरजीव होत. मिल्खा सिंह यांनी १९५८ आणि १९६२च्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. ऑलिंपिक आणि राष्ट्रकुलसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिल्खा सिंह यांना मिळाली होती. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारांने गैारविण्यात आले होते. 

मिल्खा सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी टि्वट करुन  शोक व्यक्त केला. "एक महान खेळाडूला आज गमावले आहे. मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले",असे टि्वट मोदींनी केलं आहे. 

विनाकारण अंगावर याल तर जिथल्या तिथे हिशेब करु..शिवसेनेचा इशारा   
मुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन. आजचा वर्धापनदिन शिवसेना साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबूकच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून शिवसेनेच्या  वाटचालीवर प्रकाश टाकला आहे. "महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’ चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत," अशा इशारा शिवसेनेने दिला आहे. 
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com