ओबीसी आरक्षणावरुन भाजप-काँग्रेस आमनेसामने

ओबीसीचे आरक्षण रद्द केल्याप्रकरणी भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-26T134757.909.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-26T134757.909.jpg

यवतमाळ : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप भाजप केला आहे.  ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी राज्यभरात आज ठिकठिकाणी भाजपतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. bjp jail bharo andolan bjp slam govt over obc reservation

ओबीसीचे आरक्षण रद्द केल्याप्रकरणी भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध भाजपने केला आहे. दुसरीकडे काँग्रेसने ओबीसी आरक्षणा रद्द केल्याने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण संपविण्यात केंद्र सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसने करीत यवतमाळ मध्ये तहसील चौकात आंदोलन केले. 

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने भाजप आक्रमक झाली आहे. शनिवारी (ता.26) जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यवतमाळ शहरात स्थानिक बसस्थानक चौकात भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसींचे आरक्षण कायम करण्यात यावे, या मागणीसाठी भाजपच्या ओबीसी सेलने चक्काजाम आंदोलन केले. 

भाजपच्या पदाधिकार्‍यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. बसस्थानक चौकातील मार्ग रोखून पदाधिकार्‍यांनी राज्य शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात भाजपचे आमदार मदन येरावार,  ओबीसी सेलचे विदर्भप्रमुख राजेंद्र डांगे, प्रशांत यादव, यवतमाळ नगरपालिकेतील गटनेते विजय खडसे, नगरसेवक प्रा. प्रवीण प्रजापती, प्रा. डॉ. अमोल देशमुख, सुजित राय, मनोज मुधोळकर, अजय बिहाडे, सुनील समदुरकर, मोहन देशमुख, सोमेश चौधरी, नगरसेविका संगीता कासार, राजू पडगीलवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे, भाजयुमोचे आकाश धुरट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


काँग्रेस घेणार संविधान रक्षणाची शपथ
ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. भाजपमुळेच ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केला. सामाजिक न्याय दिनी काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ओबीसी आरक्षण संपवण्यात केंद्र सरकारचा हात आरोप करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. संविधान रक्षणाची शपथ घेणार असल्याचे सांगितले. आंदोलनात शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक जावेद अन्सारी, रवी ढोक, प्रा. बबलू देशमुख, विक्की राऊत, विशाल पावडे, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके, संदिप तेलगोटे, अरुण ठाकुर, अजय किन्हीकर, छोटू सवाई, मिलींद रामटेके, सुकांत वंजारी, घनश्याम अत्रे, स्वप्नील गावंडे, शब्बीर खान, विजय राजुरकर यांचेसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com