अँलोपॅथीबाबतचे रामदेव बाबा यांचे मूळ रेकाँर्ड सादर करा..

रामदेव बाबा यांनी नक्की काय विधान केलं होतं.
1Sarkarnaa_20Banner_20_2821_29_0 - Copy.jpg
1Sarkarnaa_20Banner_20_2821_29_0 - Copy.jpg

नवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबा Ramdev Baba यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपॅथी औषधांवर टीका केली होती. याप्रकरणी रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.  सुप्रीम कोर्टानं supreme court आज रामदेव बाबा यांना त्यांनी केलेल्या विधानाचे मूळ रेकाँर्ड न्यायालयात दाखल करण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश एन. वी. रामणा, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती  ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची आज सुनावणी झाली.  
supreme court asks ramdev to place original record of his statement on allopathy

रामदेव बाबा यांचे वकील मुकुल रोहतगी यांना खंडपीठाने विचारले की, रामदेव बाबा यांनी नक्की काय विधान केलं होतं. याबाबतची सर्व माहिती आपण न्यायालयात सादर केलेली नाही. या खटल्यावर आता ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. बिहार आणि छ्त्तीसगड येथे रामदेव बाबा यांच्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने गुन्हा दाखल केला आहे. आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याचे वर्गीकरण दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात यावे, अशी मागणी रामदेव बाबा यांनी न्यायालयाकडे केली आहे. 

यावेळी रोहतगी म्हणाले, ''रामदेव बाबा एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते योग आणि आयुवैदाचे समर्थक आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी व्हाटस्अॅपवरुन आलेला मेसेज वाचून दाखविला. तो मेसेज त्यांना पाठविण्यात आला होता. रामदेव बाबांनी स्पष्ट केले आहे की त्यांना अँलोपॅथी डाँक्टरांबाबत वाईट मत नाही. त्याच्यावर दाखल करण्यात आलेले खटले दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात यावे.'' 

अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधे करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत. अ‍ॅलोपॅथिक औषधे घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे विधान रामदेव बाबा यांनी केलं होतं.  

राज्यपाल हे भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागतात!
मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ''राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याचा सन्मानच आहे. पण राज्यपाल हे भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत,'' अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यपालांचे काम काय असते हे मला सांगायची गरज नाही. राज्यपालांच्या सांगण्यावरून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावली जात आहे, हे सांगण्याचे काम भाजप करत आहे. राज्यपाल यांचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे.
Edited by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com