मेहुल चोकसीसोबतच्या त्या महिलेबाबत वकीलांचा नवीन खुलासा.. हनीट्रॅप ? -   mehul choksi succumbed to honeytrap the woman took him to the apartment where he was abducted sources | Politics Marathi News - Sarkarnama

मेहुल चोकसीसोबतच्या त्या महिलेबाबत वकीलांचा नवीन खुलासा.. हनीट्रॅप ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 जून 2021

चोकसीच्या कुंटुबियासमवेत तिचं चांगले संबध होते, काही दिवसापूर्वी ती तेथून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेली.

नवी दिल्ली :  हिऱ्यांचा व्यापारी व पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी मेहूल चोकसी यांच्याबाबत त्याच्या वकीलांनी नवीन खुलासा केला आहे. काल मेहूल चोकसीला त्यांचा पोलिसांनी पकडले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत चोकसीच्या वकीलांनी स्पष्टीकरण दिले आहे.  हनीट्रॅपच्या माध्यमातून चोकसीला अटक करण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्याला मारहाण केल्याचे फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. चोकसी सध्या डोमिनिकाच्या कारागृहात आहे. mehul choksi succumbed to honeytrap the woman took him to the apartment where he was abducted sources

चोकसीला अटक केली होती, तेव्हा त्याच्यासोबत जी महिला होती, ती सध्या कुठे आहे, असा सवाल उपस्थित करीत चोकसीच्या वकीलांनी सांगितले की चोकसीच्या घराजवळ काही दिवसापूर्वी ती महिला राहत होती, चोकसीच्या कुंटुबियासमवेत तिचं चांगले संबध होते, काही दिवसापूर्वी ती महिला तेथून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेली. त्यानंतर तिनं चोकसीला तिच्या घरी भेटण्यासाठी बोलविले होते. तिला भेटण्यासाटी तो गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याला डोमिनिका येथून अटक करण्यात आली. ज्या बोटीतून चोकसीला एँटिगुआ येथून डोमिनिकाला बोटीतून नेण्यात आले . तो कारवाईचा एक भाग होता. 

 
सध्या मेहुल हा डॅामिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. तो कारागृहात असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी सांगितले की चोकसीला दक्षिण डॅामिनिका येथून पकडण्यात आले. या ठिकाणी एकही विमानतळ नाही, चोकशी हा या ठिकाणी बोटीतून आला असावा. त्याला कैनफील्ड येथील किनाऱ्यावर पकडण्यात आले.  ज्यावेळी मेहुल चोकसीला पकडण्यात आले तेव्हा तो समुद्रात महत्वाची कागदपत्रे नष्ट करीत होता. हे डॅामिनिका पोलिसांनी पाहिले असता, त्यांना संशय आला. पोलिसांनी यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मेहुल चोकसी या बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता, असे चैाकशीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.  

 

चोकसी सध्या डोमिनिकाच्या रूग्णालयात आहे. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याला डोमिनिकाच्या चायना फ्रेंडशीप हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  त्याचे वकील अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. पण मेहूल चोकसीचे भारत प्रत्यार्पण सध्या लांबणीवर पडले असल्याची सध्याची परिस्थिती आहे. व्यापारी मेहुल चोकसी  mehul choksi याच्या प्रत्यार्पणास भारताच्या  प्रयत्नास धक्का बसला आहे. कारण डॅामिनिका न्यायालयाने त्यांच्या प्रत्यार्पणास नकार दिला आहे. मेहुल चोकसी यांच्या वकिलांनी प्रत्यार्पणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचे अपहरण करणारे दोन भारतीय एजंट भंडल गुरजीत आणि सिंह गुरमीत यांनी डोमिनिका सोडले आहे.   

Edited by : Mangesh Mahale      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख