राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेंच्या घरासमोर मराठा समाजाचा आक्रोश... -   Agitation in front of Minister of State Dattatreya Bharane house | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेंच्या घरासमोर मराठा समाजाचा आक्रोश...

वालचंदनगर
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज आक्रोश आंदोलन करण्यात आले. 

वालचंदनगर : न्यायालयाने मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे राज्यभर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन सुरु झाली आहेत. भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज आक्रोश आंदोलन करण्यात आले. 

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी भरणेही यांनीही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. भरणे यांनीही आंदोलनामध्ये सहभागी होउन मराठा समाजाची भूमिका ठामपणे मांडण्याची ग्वाही दिली 

आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर इंदापूर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाने आक्रोश आंदोलन केले. यावेळी युवकांनी राज्यमंत्री भरणे यांना मराठा समाजाची भूमिका सरकारकडे ठामपणे मांडून हक्काचे आरक्षण मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी भरणे यांनी ही मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी भरणे यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाच्या आंदोलनास माझा पाठिंबा असून मराठा समाजाची भूमिका सरकारकडे ठामपणे मांडणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत, असे भरणे यांनी सांगितले. 

यावेळी भरणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणला पाठिंबा असल्याचे पत्र दिले. आंदोलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, भिगवणचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने उपस्थित होते. भरणे यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आरक्षणासाठी पाठपुरावा सुरु आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने कोणती भूमिका मांडायची याची टिपणी तयार करण्याचे काम सुरु आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख