अमित शहांनी चंद्रकांत पाटलांना कोणती गुड न्यूज दिली?

अमित शहा यांनी ‘बधाई हो’ असे म्हटल्याचेही त्यांनी सांगितले.
What good news did Amit Shah give to Chandrakant Patil?
What good news did Amit Shah give to Chandrakant Patil?

कामेरी (सांगली)  : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कामेरीच्या (जि. सांगली) दौऱ्यावर असतानाच त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला. त्या दोघांमधील संवाद संपताच चंद्रकांत पाटील यांनी ‘गुड न्यूज’ असे शब्द उच्चारले. मात्र ती ‘गुड न्यूज’ नेमकी काय याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराचा निमित्त आमदार चंद्रकांत पाटील हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांच्या निवासस्थानी आले होते. उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद सुरु होता.

तेवढ्यात त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा फोन आहे, हे समजताच संवाद थांबवून ते थोडे बाजूला गेले. नेते, कार्यकर्त्यांनाही तो शहा यांचा फोन आल्याचे समजले. पाटील व शहा यांचा संवाद सुरू असतानाच कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरु झाली.

पाटील यांनी शहा यांच्या बरोबरचा संवाद संपवून फोन बंद केला. त्यानंतर सी. बी. पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकत चंद्रकांतदादा ‘गुड न्यूज’ असे म्हणाले. अमित शहा यांनी ‘बधाई हो’ असे म्हटल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, नेते व पदाधिकाऱ्यांची गर्दी असल्याने त्यांनी इतर तपशील सांगणे टाळले. अमित शहांनी चंद्रकांत दादांना कोणती ‘गुड न्यूज' सांगितली, हे मात्र गुलदस्त्यातच राहिली. त्यामुळे ती गुड न्यूज नक्की काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आणि तर्कवितर्कांना उधाणही आले.
 
मोठी राजकीय उलथापालथ झाली की पदवीधर मतदारसंघाबाबत मोठा निर्णय झाला. कोणा मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश निश्‍चित झाला, की जिल्ह्यातील कुणाला मोठी संधी मिळणार आहे ? असे अंदाज प्रत्येकजण लावू लागला. मात्र, चंद्रकांतदादा पाटील यांनी शहा यांच्याकडून समजलेली गुड न्यूज शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com