'मीच एकटी जाणती, बाकी इमॅच्युअर असा माझा दावा नाही'  - shoumika mahadik says i havent claim i am mature and others immature | Politics Marathi News - Sarkarnama

'मीच एकटी जाणती, बाकी इमॅच्युअर असा माझा दावा नाही' 

निवास चौगले
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी  केलेले ट्‌विट चांगलेच चर्चेत आले आहे. 'मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा दावा नाही' अशा आशयाच्या ट्‌विटने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 

कोल्हापूर : माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी  केलेले ट्‌विट चांगलेच चर्चेत आले आहे. 'मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा दावा नाही' अशा आशयाच्या ट्‌विटने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 

शौमिका महाडिक ह्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्‍टिव्ह असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटवर केलेल्या टीकेमुळे त्या ट्रोलही झाल्या होत्या. पण त्यांनी आपली बाजू खंबीरपणे मांडत टिकाकारांना उत्तर दिले होते. महाडिक यांनी बुधवारी (ता. 12 ऑगस्ट) एक ट्विट केले होते, त्यात "आज गोपाळकाला आहे, महाभारतात कौटुंबिक वादातून सातत्याने अन्याय सहन करावा लागलेल्या "पार्थ' चे युद्धात ज्याने सारथ्य केले, त्या श्रीकृष्णाचा दिवस' असे म्हटले होते. 

त्यानंतर सुमारे अर्ध्या तासातच शौमिका महाडिक यांनी दुसरे ट्विट केले होते, त्यात "मगाशी मी एका ट्विटमध्ये चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात, जेमतेम 2-3 मिनिटांत चूक कळताच मी ती सुधारली आहे. तरीही मी चुकले, हे मला बिलकूल मान्य आहे, मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही' असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर शौमिका महाडिक यांनी केलेल्या ट्‌विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. या ट्‌विटमुळे त्यांना ट्रोलही व्हावे लागले. पण, त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ट्रोल करणाऱ्यांना तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा ट्विट आणि फेसबुकद्वारे दिला आहे. 

हेही वाचा : पार्थ पवार अपरिपक्व : शरद पवार 

मुंबई : सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी करावी ही पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व पार्थ यांचे आजोबा शरद पवार यांनी झटकून टाकली आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व असून त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत नाही, असे विधान पवार यांनी केल्याने आता चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पार्थ यांनी ही मागणी केली होती. दरम्यान, या बाबत प्रतिक्रिया देण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. 

मावळमधून लोकसभा लढवून पराभूत झालेले पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राम मंदिरालाही पाठिंबा दिला होता. त्यांच्या या दोन्ही भूमिकांमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता होती. मात्र, आज पवार यांनी या सगळ्याला पूर्णविराम दिला आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख