शिवसेनेचे आमदार योगेश कदम-राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आले एकत्र 

आमदार योगेश कदम यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांविरोधात भूमिका घेतली आहे.
Shiv Sena MLA Yogesh Kadam and former NCP MLA Sanjay Kadam came together
Shiv Sena MLA Yogesh Kadam and former NCP MLA Sanjay Kadam came together

दाभोळ : रत्नागिरी येथे प्रस्तावित असलेले मेडीकल कॉलेज दापोलीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दापोली दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांच्याकडे आजी माजी आमदारांनी वरील मागणी केली. त्यावर आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्‍वासन राजेश टोपे यांनी दिले. 

सिंधुदुर्ग, तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी मेडीकल कॉलेज मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असून रत्नागिरी जिल्ह्याचे मेडीकल कॉलेज रत्नागिरी तालुक्‍यात होण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रयत्नशील आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे येऊन मेडीकल कॉलेजसाठी जागेची पाहणीही केली होती. मात्र, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन प्रस्तावित मेडीकल कॉलेजच्या जागांमध्ये 150 किलोमीटरचे अंतरही नाही, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे मेडीकल कॉलेज दापोली येथे करावे अशी मागणी आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

यावर आपण त्यासाठी निवेदन द्या. ते प्रोसेस करण्यात येईल व त्यानंतर या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले आहे. आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम यांनी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. 

आता रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडीकल कॉलेजसाठी रत्नागिरी व दापोली यांच्यात चुरस निर्माण झाली असून आता बाजी कोण मारणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे मतदारसंघातील विकास कामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमास आपल्याला बोलावत नाहीत, असे सांगून त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी दिला होता. त्यावरून दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकण दौऱ्यात तटकरे यांची पाठराखण करत शिवसेनेचे आमदार कदम यांना कानपिचक्‍या दिल्या होत्या. याशिवाय माजी आमदार संजय कदम यांनीही कदमांवर कठोर भाषेत टीका केली होती. त्यामुळे काही दिवसांपर्यंत एकमेकांवर तुटून पडणारे हे आजी माजी आमदार आज मात्र मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने एकत्र आले होते. 

विशेष म्हणजे आमदार योगेश कदम यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांविरोधात भूमिका घेत मेडिकल कॉलेज रत्नागिरीऐवजी दापोलीत करावे, अशी मागणी केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com