सतेज पाटलांची झोप होण्याआधीच महादेवराव महाडिक जिल्हा पिंजून काढतात 

गोकुळच्या सत्तेचे स्वप्न पालकमंत्र्यांना अस्वस्थ करत आहे.
Shaumika Mahadik criticizes Satej Patil without naming him
Shaumika Mahadik criticizes Satej Patil without naming him

कोल्हापूर : "दहा वर्षांपूर्वी पालकमंत्री (सतेज पाटील यांचे नाव न घेता) आप्पांसोबतच (माजी आमदार महादेवराव महाडिक) काम करत होते. आता दहा वर्षांचा गॅप पडला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना माहिती नाही. मात्र, आप्पांची दुपारची झोप जरी गेली असली तरी पालकमंत्र्यांची रात्रीची झोप होईपर्यंत आप्पा जिल्हा पिंजून काढतात,'' असा टोला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा माजी आमदार महादेवराव महाडिक यांची स्नूषा शौमिका महाडिक यांनी लगावला. 

शौमिका महाडिक यांच्या माध्यमातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरातील व्यक्तीने प्रथमच गोकुळच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. 

गोकुळ निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या तीन दिवसांत इच्छुकांची झुंबड उडाली आहे. नेत्यांचे वारसदार तसेच कार्यकर्तेही अर्ज भरत आहेत. दरम्यान, शौमिका महाडिक यांनी गुरुवारी (ता. 1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल करून गोकुळच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. करवीर प्रांताधिकारी कार्यालयात आज त्यांनी आपला अर्ज दाखल केला. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू आघाडीने मोट बांधल्यामुळे गोकुळच्या सत्तारूढ नेत्यांना दुपारची झोप मोडून लोकांची भेट घ्यावी लागत असल्याची टीका केली होती. याचाच आधार घेत शौमिका महाडिक यांनी पालकमंत्र्यांच्या टिकेला उत्तर दिले. 

त्या म्हणाल्या, "गोकुळच्या सत्तेचे स्वप्न पालकमंत्र्यांना अस्वस्थ करत आहे. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या कारभारामुळे सध्या गोकुळ संघ चांगल्या पद्धतीने सुरु आहे.'' 

गोकुळसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आत्तापर्यंत 289 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आजही अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी आवश्‍यक खबरदारी घेवून हे अर्ज भरून घेतले जात आहेत. 

हेही वाचा : परिचारक गट 41 वर्षांनंतर पुन्हा तो चमत्कार घडविणार का? 


सोलापूर : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय पंढरपूर विधानसभा मतदारसंघ 2009 नंतर आता पुन्हा एकदा घेऊ लागला आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले परिचारक कुटुंबीय या निवडणुकीत पुन्हा एकदा निर्णायक भूमिकेत आहे. विधानसभेच्या 1980 च्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक यांनी व त्यांच्या गटाने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणाला जन्म घातला. परिचारक यांनी 1980 मध्ये निवडणूक न लढविता आपली ताकद इंदिरा कॉंग्रेसचे उमेदवार पांडुरंग डिंगरे यांच्या पाठीशी उभी केली आणि कॉंग्रेसचे (यू) औदुंबरअण्णा पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर तब्बल 41 वर्षांनंतर परिचारक गट पुन्हा एकदा त्याच भूमिकेत आहे, तो चमत्कार परिचारक गट पुन्हा घडविणार का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com