सतेज पाटलांचा महाडिक गटाला टोला : आता जागतिक न्यायालयात जाऊ नका

सत्तारूढ गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले आहे.
Opposition should not go to world court now : Satej Patil
Opposition should not go to world court now : Satej Patil

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक 70 मतदान केंद्रावर घेतली जाईल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचे पालन करुनच मतदान होईल. सत्तारूढ गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले आहे. विरोधकांनी आता जागतिक न्यायालयात जाऊ नये. आतापर्यंत उच्च न्यायालय झाले. सर्वोच्च न्यायालय झाले, त्यामुळे जागतिक न्यायालयाकडे जाऊ नये. सभादांची न्याय बाजू घेवून कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. सत्तारूढ गटाने हा निर्णय मोठ्या मनाने मान्य करून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, असे आव्हान पालकमंत्री सतेज पाटील यांनी विरोधी महाडिक-पाटील गटाला दिले.

दरम्यान, जर ठरावदार कोरोना पॉझिटिव्ह असतील, तर शेवटच्या तासात त्यांना पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. कसबा बावडा येथील पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
पालकमंत्री पाटील म्हणाले, गेले वर्षभर प्रशासन सर्व नियम अटी पाळून ही निवडणूक घेईल. मतदारांना याचा त्रास होणार नाही. तालुकानिहाय मतदान आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रावर 50 मतदानच होईल. त्यामुळे सर्व सुरक्षितता पाळली जाणार आहे. सकाळी 8 ते 5 दरम्यान, मतदान होणार आहे. एका मतदान केंद्रावर 100 मतदान घेतले जाणार होते. आता पन्नासच घेतले जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे दूध उत्पादकांचा आताच नैतिक विजय झाला आहे. दूध उत्पादकांच्या दूधाला जास्ती-जास्त दर देण्यास आम्ही कटिबध्द राहणार आहोत. 

परवा राजस्थानमध्ये झालेल्या मतदानामध्ये कोरोना झालेल्या आमदारांनी पीपीई किट घालूनच मतदान केले होते. पश्‍चिम बंगालचे मतदान झाले. लोकशाहीत निवडणूका स्वीकारल्या आहेत. यातून जो निर्णय आहे, तो स्वीकारला पाहिजे. राज्य सरकारनेही सर्व नियम पाळून निवडणूक घेऊ, असे सांगितले आहे. या वेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले उपस्थित होते. 

कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक घेण्याची सूचना 

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणुकीचे दोनच टप्पे ठेवले आहेत. अशा वेळी निवडणूक थांबवण्यापेक्षा कोरोना संसर्गाचे सर्व नियम शंभर टक्के पाळून निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com