Big Breaking : सांगलीत भाजप नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी

सांगली महापालिकेच्या महापौरपदाचा धक्कादायक निकाल लागला असून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी निवडून आले.
Digvijay Suryavanshi
Digvijay Suryavanshi

सांगली : सांगली महापालिकेच्या महापौरपदाचा धक्कादायक निकाल लागला असून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी निवडून आले. 

आज सकाळी ७७ सदस्यांच्या महापालिकेत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. भाजपने धीरज सुर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादीच्या वतीने दिग्विजय सुर्यवंशी उमेदवार होते. आॅनलाईन निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर भाजपचे चार नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले. पराभव दिसू लागताच पराभव दिसू लागताच भाजपचे महापौर पदाचे उमेदवार धीरज सुर्यवंशी आणि उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदूम  निवडणूक सभागृहाच्या बाहेर पडले. 

सांगलीमध्ये भाजपची सत्ता असताना नगरसेवक फुटल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचा महापौर झाला हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे मंत्री विश्वजीत कदम यांनी भाजपला हा मोठा धक्का दिला आहे. भाजपाचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीमा नाईक 
या भाजपा नगरसेवकांन राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केल्याचे सांगण्यात आले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com