ते वक्त्यव्य करून महाडिकांनी कोल्हापूरकरांचा अपमान केला : हसन मुश्रीफ - By making that statement, Mahadik insulted the people of Kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

ते वक्त्यव्य करून महाडिकांनी कोल्हापूरकरांचा अपमान केला : हसन मुश्रीफ

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

आम्ही सर्व संस्था चांगल्या चालवल्या आहेत. जिल्हा बँक अव्वल स्थानी आणली आहे.

कोल्हापूर : गोकुळचे सत्ताधारी हे 3, 13, 23 तारखेला बिले दिली जातात, असे सांगतात. अहो, गवळी देखील १० दिवसाला शेतकऱ्याला पैसे देतात. नाही दिले तर दूध घालणार कोण? पैसे देता म्हणजे काय उपकार करता का, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मुश्रीफ म्हणाले, आम्ही सर्व संस्था चांगल्या चालवल्या आहेत. जिल्हा बँक अव्वल स्थानी आणली आहे. गोकुळ देखील ताब्यात द्या. ती संस्था देखील चांगली चालवून दाखवू, असे सांगतच मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये सत्ता आली तर धोरणात्मक निर्णय आम्ही नेते मंडळीच घेणार आहोत, असे स्पष्ट केले.

मोदी-ठाकरे सरकार हे पाहा: बेड मिळेना, ऑक्सिजन संपलेला; तीन दिवसांत मृत्यूदरात एक टक्का वाढ

महाडिक यांच्या सारखी सत्ता असती तर गोकुळमध्ये एक टँकर देखील लावला नसता, असा टोला मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना लगावला.

 चेअरमन निवड बाकी

गोकुळ निवडणुकीचा निकाल लागला आहे. फक्त चेअरमन निवड बाकी आहे असे सांगत, गोकुळ मध्ये महविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

बाप, ताप की पाप

महादेवराव महाडिक यांनी परवा आपण जिल्ह्याचा बाप असल्याचे वक्तव्य केले आहे. ते बाप आहेत, ताप आहेत की पाप, यावर खासदार संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र महाडिक यांनी असे बोलून लोकांचा अपमान केला आहे. असे बोलणे बरे न्हवे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

महाडिक काय म्हणाले होते?

''कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यावर बरीच टीका-टिपणी सुरू आहे. त्याचे उत्तर आज देण्याची मला गरज वाटत नाही. योग्य वेळी समक्ष चौकात उत्तर देईन. मी सर्वांचा बाप आहे. पुरून उरणार'', अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला होता. 

कोरोनामुळे मंदिरे बंद : सतेज पाटील, महादेवराव महाडिक यांच्यापुढे वेगळीच अडचण!
 

महाडिक म्हणाले होते, ''लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. पण, गोकुळ गोरगरिबांचा आहे. तो दूध उत्पादक-कर्मचाऱ्यांच्या ताब्यात राहिला पाहिजे. त्याला धक्का लागता कामा नये. आरोप करणे विरोधकांचे कामच आहे. पण, तुमच्या कृपेने विजय आमचाच आहे. संघ योग्य हातात राहण्यासाठी एकही मत इकडे-तिकडे होता कामा नये''. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख