...तर मी बंटी-मुन्नाच्या वादात पडलोही नसतो : हसन मुश्रीफ  - I will not even speak on the dispute between Satej Patil and Dhananjay Mahadik : Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

...तर मी बंटी-मुन्नाच्या वादात पडलोही नसतो : हसन मुश्रीफ 

सुनील पाटील 
रविवार, 18 एप्रिल 2021

केवळ पराभव समोर दिसत असल्यामुळे गोकुळचे सत्तारूढ नेते निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीमुळे कोरोना रुग्ण वाढणार नाहीत. संघाच्या निवडणुकीसाठी कोठेही सभा होणार नाही किंवा सामुहिक भेटीगाठी होणार नाहीत. कारण प्रत्येक ठरावदारासोबत विचारांची भांडवली गुंतवणूक झालेली आहे. त्यामुळे फारसा प्रचार करावा लागणार नाही. जिल्हा बॅंकेच्या कर्मऱ्यांचा संबंध गोकुळ निवडणुकीशी जोडल्यामुळे मी बोललो नाहीतर मी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या वादात पडलो नसतो, असा खुलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. 

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे  निवडणूक पुढे ढकला, रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. गोकुळच्या ठरावदाराचा मृत्यू म्हणून पत्रक पाहिले. वास्तविक ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ते गोकुळचे ठरावदार व जिल्हा बॅंकेचे कर्मचारी आहेत.

वास्तविक माजी खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणूक पुढे ढकला म्हणून केलेली मागणी चुकीची आहे. ज्या ठरावदाराचा आणि बॅंकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांचा बॅंकेत दररोज हजारो लोकांसोबत संपर्क येतो. त्याचा संबंध गोकुळशी जोडणे चुकीचे आहे. बॅंकेच्या ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचा दुदैवाने मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना 21 लाख रुपये व कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपाखाली जिल्हा बॅंकेत नोकरी दिली जाणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

....तर याही निवडणुका थांबल्या असत्या 

निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात काही तरी कारण मिळावे; म्हणून गेले असले तरी ते यशस्वी होणार नाहीत. असे असेल तर पश्‍चिम बंगालच्या निवडणुकाही थांबवाव्या लागतील. तसेच, नुकतीच विधानसभेच्या पंढरपूर मतदारसंघाची निवडणूक झाली. बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकाही थांबवल्या पाहिजे होत्या. पण केवळ पराभव समोर दिसत असल्यामुळे गोकुळचे सत्तारूढ नेते निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. 

महाडिकांनी हाही विचार करायला हवा होता

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निकटचे सहकारी व कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे विभाग प्रमुख पांडुरंग शिंडगे यांचाही गेल्यावर्षी दुदैवी मृत्यू झाला होता. त्यांना बॅंक नियमानुसार लाभ दिला आहे. पण, बॅंकेत हजारो लोक येतात. त्यांचा संपर्क येतो. यात गोकुळ ठरावदारांचा काहीही संबंध नसतो. हा विचारही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी करायला हवा होता, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

सतेज पाटलांचा हट्टाहास म्हणणे चुकीचे 

गोकुळची निवडणूक हा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हट्टाहास म्हणणे चुकीचे आहे. त्याचा काहीही प्रश्‍न नाही. जे कोरोनामुळे मयत झाले, ते जिल्हा बॅंकेचे कर्मचारी आहेत. यापूर्वीही बॅंकेचे काही कर्मचाऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाला, त्यावेळी काही गोकुळची निवडणूक नव्हती किंवा ते मयत झालेले गोकुळचे ठरावदारही नव्हते, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख