कोणत्याही धमक्या, इशाऱ्यांना मी घाबरत नाही : उद्धव ठाकरे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याला १८०० टन प्रतिदिन ऑक्सिजनची गरज भासली, ती तिसऱ्या लाटेत दुपटीहून अधिक लागेल.
कोणत्याही धमक्या, इशाऱ्यांना मी घाबरत नाही : उद्धव ठाकरे
I am not afraid of any threats or warnings: Uddhav Thackeray

सांगली  ः कोरोना रोखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रत्येकांना मास्क वापरण्यासह सर्व नियमांचे पालन करावे;अन्यथा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याला १८०० टन प्रतिदिन ऑक्सिजनची गरज भासली, ती तिसऱ्या लाटेत दुपटीहून अधिक लागेल, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. तो गांभीर्याने घेतला पाहिजे. व्यापाऱ्यांच्या दुकान सुरु करण्याच्या कोणत्याही धमक्या, इशाऱ्यांना मी घाबरत नाही. तरीही स्थानिक परस्थिती पाहून रात्री ८ पर्यंत दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २ ऑगस्ट) स्पष्ट केले. (I am not afraid of any threats or warnings: Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. प्रशासनाची आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १२५० ते १३०० टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक १८०० टन ऑक्सिजनची गरज भासली. मध्यंतरीच ऑक्सिजनचा तुटवडा झाला. त्यावेळी शेजारील राज्याकडून आपणाला मदत झाली. पुढची जी लाट आहे, त्यात केंद्रानेदेखील आपल्याला आदेश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल. 

मला विनंती करायची आहे की प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालावा. मास्क घालण्यासह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ऑक्सिजननिर्मिती तातडीने दुप्पट करणे, हे सरकारला अशक्य आहे. एकाचवेळी ऑक्सिजनची मागणी आल्यास आपणाला अन्य राज्यांकडून मिळणारी मदतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सांगली आणि पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच रुग्ण वाढ कमी होत नाही. तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवल्या जातील. मुंबई लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. कोरोना टाळण्यासाठी सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याचा विचार करावा. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करावे. उद्योजकांनी आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल, याचा विचार करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in