Gokul Election : मुश्रीफ, डोंगळे, नरके यांची विजयाकडे वाटचाल; पाटील-मुश्रीफ गटाचे १३ जण आघाडीवर 

विरोधी गटाने यापूर्वीच राखीव गटातील चार जागा जिंकलेल्या आहेत.
Gokul Election: Mushrif, Dongle, Narke on their way to victory; 13 members of Patil-Mushrif group lead
Gokul Election: Mushrif, Dongle, Narke on their way to victory; 13 members of Patil-Mushrif group lead

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीने आता विजयाच्या दिशेने कूच केली आहे. सातव्या फेरीअखेर विरोधी पाटील-मुश्रीफ गटाचे सर्वसाधारण गटातील १६ पैकी १३ उमेदवार आघाडीवर आहेत, तर  सत्तारुढ महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या गटाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. विरोधी गटाने यापूर्वीच राखीव गटातील चार जागा जिंकलेल्या आहेत.  

विरोधी पाटील-मुश्रीफ गटाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे (१७१०), अजित नरके (१७०५), अभिजित तायशेटे (१६९८), नवीद हसन मुश्रीफ (१६८२), शशिकांत पाटील-चुयेकर (१६६३), आबाजी ऊर्फ विश्वासराव पाटील (१६५३), किसन चौगले (१६३०), रणजितसिंह पाटील (१६१७), नंदकुमार ढेंगे (१६०३), कर्णसिंह गायकवाड (१५९७),  बाबासाहेब चौगले (१५६८), संभाजी पाटील (१४८६), प्रकाश पाटील (१४८०) यांची सातव्या फेरीअखेर विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

सत्तारुढ महाडिक गटाचे बाळासाहेब ऊर्फ वसंत खाडे (१५५६), अंबरिषसिंह घाटगे (१५५२), चेतन नरके (१५२६) हेही विजयी पथावर आहेत. दरम्यान, या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीतून ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, विश्‍वास पाटील यांनी विरोधी आघाडीत प्रवेश केला होता. 

दरम्यान राखीव गटातील अनुसुचित जाती गटातून पाटील-मुश्रीफ आघाडीचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे विजयी झाले आहेत. त्यांना ३४६ मते मिळाली आहेत. इतर मागासवर्गीय गटातून अमर पाटील यांनी बाजी मारली असून त्यांनी ४३१ मते घेतली आहेत. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून बयाजी शेळके विजयी झाले आहेत. महिला गटातून अंजना रेडेकर या विजयी झाल्या आहेत. या चार जागा हसन मुश्रीफ-सतेज पाटील गटाने जिंकल्या आहेत.

दरम्यान, महाडिकांच्या घरातून ‘गोकुळ’च्या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या शौमिका महाडिक ह्या विजयी झाल्या आहेत. मात्र, त्यांना सुश्मिता राजेश पाटील यांच्याशी जोरदार टक्कर द्यावी लागली. महाडिक यांनी ४० मते अधिक घेत विजयश्री खेचून आणली. शौमिका महाडिक विजयी झाल्या असल्या तरी या निवडणुकीत सत्तारूढ गटातील विद्यमान संचालक विलास कांबळे, पी. डी. धुंदरे व विश्वास जाधव हे पराभूत झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com