एफआरपी रद्दला पाठिंबा दिल्यास राज्य सरकारचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल - Former MP Raju Shetty criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

एफआरपी रद्दला पाठिंबा दिल्यास राज्य सरकारचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 एप्रिल 2021

केंद्रसरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा एफआरपी कायदा रद्द करू पाहत आहे.

कोल्हापूर : केंद्रसरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा एफआरपी कायदा रद्द करू पाहत आहे. राज्यातील महाविकार आघाडी सरकारने या धोरणाला पाठिंबा दिल्यास ऊस उत्पादक शेतकरी त्यांचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवार दिला आहे. 

यावेळी शेट्टी म्हणाले की ''ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाऱ्यांनी पंधरा दिवसात उसाची देयके अदा करण्याबाबतचा एफआरपी कायदा देशात आहे. साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती बिघडली असल्याने एफआरपी तीन टप्प्यात देण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे.

'' केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन कृषी कायदे करुन अदानी-अंबानींच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खासगी साखर कारखानदार, साखर सम्राटांच्या दावणीला बांधण्यासाठी एक रक्कमी एफआरपी कायदा रद्द करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणांना पाठिंबा दिल्यास राज्यातील महाविकास आघाडीचा डोलारा भुई सपाट केला जाईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.  

हे ही वाचा : 

पवारांच्या आवाहनास अभिजित पटालांचा प्रतिसाद; धाराशिव कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प

पंढरपूर : राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी आज दिली. 

अशी ही भाऊबंदकी : आमदार काकाचे करिअर उद्धवस्त करण्यासाठी पुतण्याचाच डेंजर डाव!
  

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्मितीचे प्लॅंट उभे करावेत, असे आवाहन केले आहे. त्यानंतर वसंतदादा शुगर  इन्स्टिट्यूटने ता. २३ एप्रिल रोजी झूम मिटींगद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेतली. त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. त्यामध्ये त्यांनी धाराशिव साखर कारखान्यात पहिला ऑक्सीजन प्लॅंट सुरू केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यानुसार त्यांनी मौज इंजिनिअरींगच्या माध्यमातून काम सुरू केले आहे.
 
अभिजीत पाटील म्हणाले की, सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सीजनचा तातडीने पुरवठा सुरू व्हावा, यासाठी ‘व्हीएसआय’कडून तशा सूचना केल्या आहेत.

कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘माॅलेक्युलर सिव्ह' वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीच्या कामास सुरवात केली आहे. कारखान्यात प्रतिदिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. राज्यातील पहिला ऑक्सीजन निर्मिती करणारा पायलट प्रकल्प कार्यान्वीत होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 

कारखान्यास ऑक्सिजन निर्मितीस लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने द्याव्यात, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकल विभागाला दिल्याचे ही अभिजीत पाटील यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख