केवळ उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश करू नका : माजी आमदाराचा इशारा

मी बांधलेला मतदारसंघ अजूनही भक्कम आहे.
Don't join Shiv Sena just for candidature : Sadanand Chavan
Don't join Shiv Sena just for candidature : Sadanand Chavan

चिपळूण  ः स्वार्थ आणि उमेदवारीसाठी कोणी शिवसेना पक्षात येऊ नये, असा इशारा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी डेरवण येथे शिवसेनेच्या मेळाव्यात दिला. त्यांचा हा इशारा शिवसेनेत नव्याने प्रवेश करणाऱ्यांसाठी असला तरी मीसुद्धा अजून शर्यतीत आहे, याचे संकेत त्यांनी पक्षातील लोकांना तसेच नव्याने येणाऱ्यांना दिला आहे. (Don't join Shiv Sena just for candidature : Sadanand Chavan)

विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचे चिपळूणमध्ये डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर सदानंद चव्हाण यांनी चिपळूणची बांधणी केली आहे. दोनवेळा ते चिपळूणमधून निवडून आलेले आहेत. मागील म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शांत झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण महापूराच्या संकटानंतर राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले आहेत. 

राज्यातून शिवसेनेच्या माध्यमातून आलेली मदत त्यांनी चिपळूण शहर आणि परिसरातील आपद्ग्रस्त गावांमध्ये वाटली. चिपळूणसह संगमेश्वर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे सुरू केले आहेत. 

डेरवण येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी पक्षात उमेदवारीसाठी येणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी पक्षाची ताकद संपलेली नाही किंवा पक्षाची मते कमी झालेली नाहीत. मी बांधलेला मतदारसंघ अजूनही भक्कम आहे. शिवसेनेच्या या मतांवर डोळा ठेवून कोणी पक्षात येणार असेल तर त्यांनी येऊ नये, असा इशाराच सदानंद चव्हाण यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com