भाजपमध्ये नाराजीनाट्य : ZP उपाध्यक्षांसह सदस्याचा तडकाफडकी राजीनामा 

यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये खळबळ उडाली आहे.
Dissatisfied with the election of Speaker in Sindhudurg Zilla Parishad; Member resign, including ZP vice president
Dissatisfied with the election of Speaker in Sindhudurg Zilla Parishad; Member resign, including ZP vice president

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विषय समितीच्या सभापती निवडीत भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी लॉरेन्स मान्येकर यांचा पत्ता कट केल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह भाजपचे अनेक जुने, नवीन सदस्य नाराज झाले आहेत. म्हापसेकर यांनी उपाध्यक्षपदासह सदस्यपदाचा, तर संजय देसाई यांनी सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, आपल्याकडे अद्याप कोणाचेही राजीनामे आले नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली. 

भारतीय जनता पक्षाचे नेते, खासदार नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये असताना डॉ. अनिशा दळवी यांना शिक्षण व आरोग्य समितीचे सभापतिपद दिले होते. सभापती पदावरून उतरल्यानंतर डॉ. दळवी यांनी आंतरजिल्हा बदली शिक्षक सोडण्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. सत्तेत असतानाही विरोधी भूमिका घेतल्याने दळवी यांच्या विरोधात भाजप सदस्यांमध्ये नाराजी होती. तरीही आजच्या निवडीवेळी दळवी यांना पुन्हा संधी दिल्याने ही नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हापसेकर यांनी तत्काळ आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य संजय देसाई यांनीही सदस्यपदाचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. 

याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी "आपल्याकडे कोणाचेही राजीनामे अद्याप आले नाहीत,' असे सांगितले. 

राजीनाम्याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर म्हणाले, "मला उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. गेली काही दिवस अध्यक्षपदासह सर्व विषय समिती सभापतिपदाचा कारभार मिळाला. त्यामुळे मी समाधानी आहे. दोन महिन्यांपूर्वी मी नारायण राणे यांना भेटून उपाध्यक्ष बदला, अशी मागणी केली होती; परंतु आज चुकीची निवड झाल्याने अन्य सदस्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी सदस्यपदासह उपाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मी त्यावर ठाम आहे.'' 

संजय देसाई भाजपला सोडचिठ्ठी देणार 

जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या आजच्या निवडीवेळी अन्याय झाल्याने मी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे सुपूर्त केला आहे. भाजप सदस्यत्वाचा उद्या (शनिवारी, ता.27 मार्च) मी राजीनामा देणार आहे, असे संजय देसाई यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com