सांगलीतील सत्तांतर म्हणजे गुंडगिरी अन्‌ तोच त्यांचा 'करेक्‍ट कार्यक्रम' 

काहींना पळवून नेऊन त्यांच्या नातेवाईकांनाही आणि आम्हाला भेटून दिले नाही. यालाच ते करेक्‍ट कार्यक्रम म्हणत असतील तर उत्तम आहे.
Chandrakant Patil's first comment on the transfer of power in Sangli Municipal Corporation
Chandrakant Patil's first comment on the transfer of power in Sangli Municipal Corporation

सांगली : सांगली महानगरपालिकेत कॉंग्रेस आघाडीने घडवून आणलेले सत्तांतर हे एक प्रकारची गुंडगिरी आहे. तोच त्यांचा करेक्‍ट कार्यक्रम आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 

विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी यानिमित्ताने प्रथमच सांगली महापालिकेतील भाजपच्या पराभवावर भाष्य केले आहे. 

ते म्हणाले,"सांगलीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसने भाजपच्या सात नगरसेवकांना अक्षरक्ष पळवून नेले. काहींना केसेसमध्ये जामीन मिळवून देण्याचे खोटे सांगितले होते. काहींना पळवून नेऊन त्यांच्या नातेवाईकांनाही आणि आम्हाला भेटून दिले नाही. यालाच ते करेक्‍ट कार्यक्रम म्हणत असतील तर उत्तम आहे. ती त्यांची जबाबदारी घेत आहेत, हे चांगलेच आहे. त्याला आता जनताच उत्तर देईल. तेच घोडेबाजार घोडेबाजार म्हणायचे आणि त्यांनीही तेच केले आहे. आमचं कौतुक केलं पाहिजे की अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारात दंगली उसळल्या असत्या. मोर्चे निघाले असते. आम्ही कार्यकर्त्यांना थेट सांगितलं. त्यांना जे करायचे ते करु द्या. नागरीकच त्यांना उत्तर देतील. या सर्व प्रकाराची आम्ही चौकशी केली आहे. ज्यांनी विरोधी मतदान केले, त्यांना नोटिसी दिल्या जातील. कायद्यानुसारची कारवाई होईल.'' 

ते म्हणाले,""मी दोन दिवस आधी सांगलीत गेलो होतो. सारेजण उपस्थित होते. आम्ही सर्वांनी एकत्रितपणे जेवणही केलं. फुटिरांपैकी काही फॉर्म भरायलाही हजर होते. मात्र शेवटी ते गेले. असो आम्ही 36 मते टिकवली आणि आम्ही तिथं चुकीच्या गोष्टींना ताकदीने विरोध करीत राहू.'' 


हेही वाचा : आमदारकीचे तिकीट नाकारलेल्या नारायण पाटलांना ठाकरेंकडून भेटीचे निमंत्रण 

करमाळा : करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारून केलेली चूक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, उमेदवारी न देताही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले नारायण पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलावून घेत त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षवाढीबाबत चर्चा केली. या वृत्ताला नारायण पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. 

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर नारायण पाटील यांनी पाच वर्षांत करमाळा विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे व त्यांचा जनसंपर्क पाहता 2019 च्या निवडणुकीत शिवसेना त्यांची उमेदवारी कापेल, असे स्वप्नातदेखील कोणाला वाटत नव्हते. मात्र, तत्कालीन जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी ऐनवेळी रश्‍मी बागल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत आणत करमाळ्याची उमेदवारी बहाल करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com