भाजप खासदाराने केले शिवसेना खासदार राऊतांच्या कामाचे कौतुक 

खासदार विनायक राऊत हे चांगले प्रयत्न करत असून त्यांना यापुढे आमचेही सहकार्य राहील.
BJP MP Jugal Kishore Sharma lauded the work of Shiv Sena MP Vinayak Raut
BJP MP Jugal Kishore Sharma lauded the work of Shiv Sena MP Vinayak Raut

कुडाळ ः चिपी येथील विमानतळाची आज (ता. 1 मार्च) संसदीय अंदाज समितीने पाहणी केली. या विमानतळाला अद्याप डायरेक्‍टडेड जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशनची (डीजीसीआय) परवानगी मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर समिती आपला अहवाल संसदेला सादर करणार आहे. 

दरम्यान, या समितील सदस्यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली. त्यातील भाजप खासदार जुगल किशोर शर्मा यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या कामाचे कौतुक केले. 

जिल्ह्यात चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी संसदीय अंदाज समिती आज दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विमानतळाची पाहणी करतानाच विमानतळ बांधकाम कंपनी आयआरबीचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. 

समितीमध्ये बापट यांच्यासह "डीजीसीआय'चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना तेथील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश होते. अद्यापही विमानतळाचा संलग्न रस्ता झालेला नाही. विमानतळासाठी पुरेशी विद्युत जोडणीदेखील नाही. पाणीपुरवठ्याचे कामदेखील अपूर्ण आहे. 

या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते; परंतु या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टीची दुरुस्तीदेखील बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने उड्डाणांसाठी परवानगी दिलेली नाही. 

या विमानतळावरून उड्डाणासाठी अलायन्स एअरलाइन कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचा तिकीट काउंटरदेखील विमानतळावर सुरू झाला आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार आहे. 

खासदारांच्या समितीची "सिंधुदुर्ग'ला भेट 

मालवण : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदारांच्या केंद्रीय समितीतील अध्यक्ष गिरीश बापट, खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य खासदारांनी आज दुपारी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली. यावेळी शिवराजेश्‍वर मंदिरात जात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. 

मिनी पार्लमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदारांच्या 30 सदस्यांच्या केंद्रीय समितीने आज चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. त्यानंतर या समितीतील अध्यक्ष बापट, खासदार राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांनी येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली.

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, मंदार केणी, यतीन खोत, श्वेता सावंत, सेजल परब, पूनम चव्हाण, तृप्ती मयेकर, पूजा तळाशीलकर, प्रांत वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 

किल्ल्यावर वायरी भुतनाथ ग्रामपंचायत व किल्ले रहिवाशांच्यावतीने खासदारांचे स्वागत करण्यात आले. 

या वेळी भाजपचे खासदार जुगल किशोर शर्मा यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, "आज आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास भेट देता आली. खासदार विनायक राऊत हे संसदेत सातत्याने येथील विकासकामाबाबत आवाज उठवत असतात. जिल्ह्याच्या महत्वाकांक्षी चिपी विमानतळ प्रकल्पास आज भेट देत पाहणी करण्यात आली असून लवकरच हे विमानतळ सुरू होईल. येथील विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत हे चांगले प्रयत्न करत असून त्यांना यापुढे आमचेही सहकार्य राहील.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com